मराठा आंदोलक भडकले, आंदोलकांकडून भाजपच्या नेत्याला शिवीगाळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव एकवटलेले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) हे गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. यावर सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याबाबत हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र मराठा समाजाला आता ओबीसीतूनच आरक्षण हवं असल्याचं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर राज्यभरातील नेते मंडळी संतापले आहेत.

आरक्षणाला वेगळं वळण

भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange patil) यांचे आता सर्व लाड पुरवले आहेत. उपोषणास्थळी मी सहा वेळा गेलो होतो. त्यांना सरकारने मदत केली आहे. त्यांनी अवाक्यातच बोलावं असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांच्यावर हल्ला चढवला आहे. विधानसभेमध्ये हा मुद्दा चांगलाच तापला. यामागे शरद पवार असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला. यावरून आता आरक्षणाला वेगळं वळण प्राप्त झालं आहे.

मराठा आंदोलक रमेश पाटील यांने प्रवीण दरेकर यांना अपशब्द वापरले आहेत. प्रवीण दरेकर आणि मराठा आंदोलक रमेश पाटील बोलतानाचा ऑडिओ कॉल क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणी संभाजीनगरमधून पोलिसांनी रमेश पाटील यांना अटक केली आहे.

संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी प्रवीण दरेकर यांना शिवीगाळ केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे मराठा आरक्षणाला एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे. सोशल मीडियावर ऑडिओ कॉल क्लिप व्हायरल होत आहे. यामुळे आता मराठा आंदोलक रमेश पाटील यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे.

मनोज जरांगे यांना अटक करण्यासाठी धडपड

संभाजीनगरमध्ये काही दिवसांपासून भाजपकडून मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्यासाठी निवेदन देण्यात यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांना अटक करा या मागणीसाठी 50 ते 60 पोलीस पदाधिकाऱ्यांनी पोलीस कमिशनरींना निवेदन देणार असल्याचं बोललं गेलं आहे, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे.

रमेश पाटील यांना अटक केल्यानंतर संभाजीनगरमध्ये पोलीस बंदोबस्त केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी किती वळण घेणार हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Manoj Jarane patil Maratha Protestor Arrested

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी समोर! मंत्रालयात घडलेल्या प्रकाराने महाराष्ट्रात खळबळ

मोठी बातमी! आमदार रोहित पवारांना धक्का, अडचणी आणखी वाढणार

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना दहा टक्के आरक्षण मान्य पण…

नशेत धूत होऊन सलमान पोहोचला सेटवर, डायरेक्टरनं केलं असं काही की..

“लग्नानंतर व्यक्ती कधीही..”, कॅटरिनासोबतच्या नात्यावर विकी कौशलचा मोठा खुलासा