Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीती ही जगभर प्रसिद्ध आहे. अनेक लोकं या चाणक्यनीतीचा अवलंब करताना दिसतात. चाणक्य यांनी मैत्री, दुश्मणी सुख दुख, कुटुंब, नातेसंबंध, व्यवसाय या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. याप्रमाणे व्यवहारिक जीवनातील काही बारकावे देखील त्यांनी आपल्या चाणक्यनीतीच्या माध्यमातून सांगितले आहे.
काय सांगते चाणक्यनीती?
आपण अनेकदा छोट्या गोष्टींचा फार विचार करत नाही, पण चाणक्यनीती छोट्या मोठ्या गोष्टी शिकवते. जसे की चाणक्यनीती सांगते की घर बांधायचे असेल तर आसपासच्या परिसरातून शिकण्यासारख्या आणि जीवनावश्यक बाबी माणसाच्या आयुष्याला शिकवण देणाऱ्या असाव्यात असं चाणक्यनीती सांगते. यामुळे रोजगार आणि ज्ञान संपादन करता येईल अशा ठिकाणी घर असावे असं चाणक्यनीती सांगते.
Chanakya Niti | कुठे वास्तव्य असू नये?
जिथे नातेवाईक नाहीत, जिथे उपजिविकेचं साधन नाही, मित्र नाहीत, नातेवाईक नाहीत अशा ठिकाणी ज्ञान मिळणं कठीण असते. यामुळे अशा ठिकाणी राहून माणसाची गुणवत्ता वाढत नसेल तर त्यांनी अशा ठिकाणी राहू नये. ज्या देशात तसेच ज्या ठिकाणी मित्र मैत्रिणी आहेत, नातेवाई आहेत, रोजगार आहे अशा ठिकाणी राहाणं हे माणसाच्या आयुष्याला सकारात्मकतेची वाट दाखवणारी बाब आहे.
ज्या ठिकाणी ब्राह्मण, राजा, वैद्य नाहीत अशा ठिकाणी राहणे आयोग्य आहे. अशा ठिकाणी राहू नये, अशी माहिती आचार्य चाणक्य यांनी दिली आहे.
दान करणाऱ्या परदेशात वास्तव्य करा
ज्या देशामध्ये किंवा परदेशात दान केलं जात नसेल तर तिथं राहू नये. कारण दान केल्यानं पुण्य तर लागतंच मात्र आत्मा देखील शुद्ध होतो अशी माहिती चाणक्यनीती देत असते.
व्यक्तीने अशा ठिकाणी राहायला हवं जिथं सर्व लोकं एकत्रित राहतात. एकोप्याची भावना तयार होते. समाजसुधारणा करता येते, असे चाणक्यनीती आपले विचार सांगत असतात. अशा ठिकाणीच त्याचं वास्तव्य (घर) असावं अशी माहिती चाणक्यनीतीनं दिली आहे.
News Title – Chanakya Niti News Update
महत्त्वाच्या बातम्या
पंकजा मुंडेंचं एक पाऊल पुढे; भाऊ धनंजय मुंडेही करणार मदत
महिला पुरुषांमधील ‘या’ गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात!
मनोज जरांगेंच्या उमेदवारीबाबत अखेर मोठा खुलासा!
सभागृहात राडा, राम कदम रोहित पवार यांच्यावर भडकले, पाहा व्हिडीओ