मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून बारामती दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना गोविंद बागेत जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट
शरद पवारांनी (Sharad Pawar) मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांना आधी फोन करून आणि नंतर पत्र पाठवून गोविंद बागेत जेवायला बोलावलं आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घरी येऊन जेवणाचा आग्रह केला आहे.
अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांचे समर्थक आणि अजित पवार यांचे समर्थक अशा दोन गटात पक्ष विभागला गेला आहे. असं असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत जेवणाचं निमंत्रण दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर
बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान मैदानावर नमो महारोजगार मेळाव्याला शरद पवार उपस्थिती लावणार आहेत. 2 मार्चला हा कार्यक्रम होणार आहे, त्यानिमित्ताने अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत
पवारांच्या निमंत्रणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
शरद पवारांच्या या निमंत्रणावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि फोनही केला. अतिथी देवो भव, असं त्या म्हणाल्यात.
बारामतीमध्ये आमच्या बारामतीमध्ये आल्यावर आम्हाला खूप आनंद वाटेल, जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आलात तर. जेवणाचा मेन्यू मी ठरवत नाही, प्रतिभा पवार ठरवतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
पंकजा मुंडेंचं एक पाऊल पुढे; भाऊ धनंजय मुंडेही करणार मदत
महिला पुरुषांमधील ‘या’ गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात!
मनोज जरांगेंच्या उमेदवारीबाबत अखेर मोठा खुलासा!
सभागृहात राडा, राम कदम रोहित पवार यांच्यावर भडकले, पाहा व्हिडीओ
मराठा आंदोलक भडकले, आंदोलकांकडून भाजपच्या नेत्याला शिवीगाळ
“मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो”; अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत