मनोज जरांगेंच्या उमेदवारीबाबत अखेर मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने विधिमंडळ चांगलंच गाजलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर भाजपने त्यांना चांगलंच घेरलं. आता लवकरच जरांगे (Manoj Jarange Patil ) यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार आहे. अशातच जरांगे पाटील लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत आहेत.

वंचित बहुजन आघाडीने थेट मविआ नेत्यांसमोर मनोज जरांगे पाटील यांना महिविकास आघाडीने जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. त्यातच वंचितने महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 27 जागांची मागणी केल्याचं म्हटलं जातंय.

अशातच वंचितच्या या प्रस्तावावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (sanjay raut) आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात आता जरांगे पाटील यांचीही चर्चा होऊ लागली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil ) उमेदवारीबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्याकडे तसा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही महाविकास आघाडीत केवळ जागावाटपावर चर्चा करत आहोत. मात्र, अजूनही जरांगे यांना उमेदवारी देण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असं म्हटलं जातंय.

पुढे राऊत यांनी वंचितच्या प्रस्तावावरही प्रतिक्रिया दिली. वंचितच्या प्रस्तावाचा कागद सर्वांना मोठा दिसत असला तरी त्यामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये केलेल्या कामांची माहिती आहे. त्यावर आम्ही सर्वजण चर्चा करत आहोत. आमच्याकडे एकूण 48 जागा आहेत. आम्ही चार पक्ष या जागा वाटून घेणार आहोत.

जरांगे यांना उमेदवारी मिळणार?

दरम्यान, वंचितकडून जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil ) आमच्याजवळ उशी कुठलीही मागणी केलेली नाही, पण आम्हीच हा प्रस्ताव पुढे ठेवला आहे.

News Title :  Sanjay Raut statement regarding Manoj Jarange Patil Lok Sabha candidature 

महत्त्वाच्या बातम्या- 

अक्षय कुमारकडून मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी 1 कोटी रूपयांचे दान!

सामन्यादरम्यान चाहत्याचा मैदानात शिरकाव; स्टार्कच्या पत्नीनं शिकवला चांगलाच धडा

सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटींचे नुकसान!

झारखंड! रेल्वेचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, भागलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसची धडक

तापसी पन्नू लग्न करणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीचं सूचक विधान, म्हणाली…