पंकजा मुंडेंचं एक पाऊल पुढे; भाऊ धनंजय मुंडेही करणार मदत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pankaja Munde | राज्यामध्ये आता आगामी लोकसभा निवडणूका होऊ घातली आहे. याचपार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून आहेत. प्रत्येक पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. लोकसभेनंतर लगेचच विधानसभा निवडणुकीसाठी लगबग सुरू होईल. अशातच असे काही मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी नेमकं तिकिट कोणाला द्यायचं हा मोठा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. यामध्ये बीड मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्लॅन बी तयार ठेवला असल्याचं बोललं जात आहे.

धनंजय मुंडे स्टार प्रचारक

पंकजा मुंडे (Pankaja Munde) लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभेमध्ये अनेकांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानसभेचं तिकिट देणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता भाजपने पंकजा मुंडे यांना विधानसभा नाहीतर प्लान बी म्हणून आपला भाऊ धनंजय मुंडे यांचे स्टार प्रचारक म्हणून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

प्रितम मुंडे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकिट देणार?

बीडच्या खासदार प्रितम मुंडे म्हणजेच पंकजा मुंडे यांच्या बहिण असून प्रितम मुंडे यांच्या ऐवजी लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आहे. बीडमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावरून चर्चा आहे. भाजपमधील वरिष्ठ पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीचे तिकिट देणार की प्रितम मुंडे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकिट देणार याबाबत अजूनही कोणतीही भूमिका घेतली गेली नाही.

काही वर्षांआधी पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे यांच्यात टफ फाईट झाली होती. यावेळी धनंजय मुंडे यांनी विजयी मिळवला. मात्र आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये अजित पवार गटामध्ये धनंजय मुंडे आहेत. अजित पवार यांनी भाजपसोबत युती केली असल्यानं आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची गणितं बदलली आहे.

सध्या धनंजय मुंडे यांना कृषीमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांना माननारा मोठा वर्ग आहे. भाजपचं राष्ट्रीय सचिव पद आहे. अशातच आता लोकसभा तिकिट कोणाला द्यायचं यावर भाजपच्या वरिष्ठांनी प्रितम मुंडे यांना तिकिट देण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे.

बीडमध्ये मध्यंतरी एक सभा झाली होती तेव्हा त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीवर भाष्य केलं होतं. काही करेन पण माझ्या बहीणीला लोकसभेच्या निवडणुकीतून बसवणार नाही. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं त्या म्हणाल्या होत्या.

News Title – Pankaja Munde beed Assembly Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

अक्षय कुमारकडून मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी 1 कोटी रूपयांचे दान!

सामन्यादरम्यान चाहत्याचा मैदानात शिरकाव; स्टार्कच्या पत्नीनं शिकवला चांगलाच धडा

सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटींचे नुकसान!

झारखंड! रेल्वेचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, भागलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसची धडक

तापसी पन्नू लग्न करणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीचं सूचक विधान, म्हणाली…