‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा महत्वाचा इशारा

Weather News | राज्यात या आठवड्यात वातावरणात मोठा बदल दिसून आलाय. विदर्भामधील जिल्ह्यांमध्ये तर गारांचा पाऊस झाला. मराठवाड्यातील काही भागांमध्येही जोरदार पाऊस (Weather News) पडला. तर, आज पुण्यात वातावरणामध्ये बदल झाल्याचं दिसून येत आहे.

पुणे (pune) शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण राहणार आहे. पहाटेच्या सुमारास शहरातील काही भागात पावसाने हजेरी लावली. वाढत्या तापमानामुळे पुढील दोन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुण्यात आज जोरदार पावसाची शक्यता

आज (1 मार्च) पुणे शहरात दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत गारपीट होण्याची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने कोणता ऋतु सुरू आहे, याचाच प्रश्न सर्वांना पडलाय. त्यातच या बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्याही अनेक समस्या उद्भवत आहेत.

मुंबई शहरामध्येही ढगाळ वातावरण (Weather News) तयार झालं आहे. मुंबई शहर व उपनगरात पुढील 24 तासांत दुपारी किंवा संध्याकाळी वातावरण अंशत: ढगाळ असणार आहे. तसेच कमाल तापमान 37 व किमान तापमान 24 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

‘या’ भागांना यलो अलर्ट

हवामान विभागाने (Weather News) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट दिला आहे. यात जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांचा समावेश आहे. तर, 3 मार्चला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट असणार आहे.

अचानक पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे अजूनच भर पडली आहे. रब्बी पिकांचं यामुळे बरंच नुकसान झालं आहे. विदर्भ आणि खान्देशात अवकाळी पावसाने पिकांचं जास्त नुकसान झालं आहे.

News Title- Weather News Chance of rain in some parts of the state today 

महत्वाच्या बातम्या-

सुरेश धस मराठा आरक्षणावर काय बोलले?, का होतेय या भाषणाची एवढी चर्चा? पाहा व्हिडीओ

‘…त्यांचा शब्द डावलणं थोडं जड जातंय’; जरांगे स्पष्टच बोलले

चाणक्यानं सांगून ठेवलंय, ‘या’ पाच जागांवर असेल घर तर होईल बरबादी!

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट!

पंकजा मुंडेंचं एक पाऊल पुढे; भाऊ धनंजय मुंडेही करणार मदत