सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather Update | हवामान विभागाने राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Maharashtra Weather Update) आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.

राज्यात पुढील दोन दिवस अनेक भागांत ढगाळ वातावरण राहणार असून, काही भागांत अवकाळी पाऊस पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसामुळे अगोदरच पिकांचं भरपूर नुकसान झालं आहे. त्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार म्हटल्यावर शेतकरी चिंतेत पडला आहे.

आता उन्हाळ्याचा ऋतु असताना पाऊस पडतोय. यामुळे आरोग्याच्या बाबतीतही अनेक समस्या पुढे येत आहे. सर्दी-खोकला आणि तापेच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. आता पुन्हा दोन ते तीन दिवस अवकाळी बरसणार आहे.

‘या’ भागांना यलो अलर्ट

महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागामध्ये कालच जोरदार पाऊस झाला आहे. आजही येथे ढगाळ (Maharashtra Weather Update) वातावरण राहणार आहे.

यासोबतच पुणे, सातारा, जालना, ठाणे, रायगड आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज देण्यात आला आहे.

पुणे-मुंबईत ढगाळ वातावरण

राज्यातील अनेक शहराच्या कमाल तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. यामुळे ढगाळ वातावरण तयार होत आहे. मुंबई शहरामध्येही ढगाळ वातावरण (Maharashtra Weather Update) तयार झालं आहे. मुंबई शहर व उपनगरात पुढील 24 तासांत दुपारी किंवा संध्याकाळी वातावरण अंशत: ढगाळ असणार आहे. तसेच कमाल तापमान 37 व किमान तापमान 24 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुण्यात आज सकाळी हलका पाऊस पडला. आज दिवसभर येथेही ढगाळ वातावरण राहणार आहे.

News Title-  Maharashtra Weather Update

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! संभाजी भिडे थोडक्यात वाचले, धक्कादायक माहिती समोर

बारामतीचा उमेदवार ठरला!; अखेर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा खुलासा

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी

‘हा’ शेअर करेल मालामाल; गुंतवणूकदारांना अंत्यत मोलाचा सल्ला

आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल!