भाजपकडून चंद्रकांत पाटलांना लोकसभेची उमेदवारी, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BJP Candidate List | लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या असून सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशात सर्वांचं लक्ष भाजपच्या उमेदवार यादीकडे (BJP Candidate List) लागलं होतं. भाजप कोणाला संधी देणार? कोणाचं तिकीट कापणार? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं. अखेर भाजपने उमेदवार यादी जाहीर केली आहे.

दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असं सांगितलं. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे. 34 केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत 28 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढणार आहे. भाजपने पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 80 पैकी 51 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्येला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. बासुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी (BJP Candidate List) देण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील पुन्हा नौसारी मधून लढणार

तसेच गुजरात भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटलांना देखील त्यांनी लोकसभेची उमेदवारी दिली आहे. सीआर पाटील नौसारी लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत.

कोण आहेत सी आर पाटील?

सी. आर. पाटील मूळचे जळगावचे. पण, वडील गुजरातमध्ये स्थलांतरित झाले, पाटील यांच्या राजकीय प्रवासही तिथूनच सुरू झाला. पण, त्याआधी ते पोलीस सेवेत होते. गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील म्हणजे सी. आर. पाटील यांना दिलं होतं. सी आर पाटील मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.

महत्त्वाच्या बातम्या- 

एकाच दिवशी भाजपला सलग दोन मोठे झटके!

‘या’ तीन कामानंतर अंघोळ करणं आवश्यक, अन्यथा…

देशात खळबळ! राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

‘जग जिंकत होते, तेव्हा लोक म्हणाले संसार…’, सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत

पुणे हादरलं! ‘या’ भागातून तब्बल 2 कोटींचं ड्रग्स जप्त