नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे. 34 केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत 28 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत महाराष्ट्रातील एकाही लोकसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एका नेत्याला संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना भाजपने लोकसभा उमेदवारीच्या पहिल्या यादीत संधी दिली आहे. कृपाशंकर सिंह हे मुंबईतील महत्त्वाचे नेते मानले जातात.
BJP Candidate List | भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढणार आहे. भाजपने पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 80 पैकी 51 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्येला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. बासुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी (BJP Candidate List) देण्यात आली आहे.
भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत (BJP Candidate List) महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी दुसऱ्या टप्प्यात जाहीर होईल, असा अंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपकडून चंद्रकांत पाटलांना लोकसभेची उमेदवारी, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?
एकाच दिवशी भाजपला सलग दोन मोठे झटके!
‘या’ तीन कामानंतर अंघोळ करणं आवश्यक, अन्यथा…
देशात खळबळ! राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
‘जग जिंकत होते, तेव्हा लोक म्हणाले संसार…’, सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत