मोठी बातमी! सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वाराणसी’तून लढणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PM Narendra Modi | भाजपकडून पहिली 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्यासह राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजंत पांडा आणि माध्यम प्रमूख अनिल बलोनी यांनी पत्रकार परिषेद घेत आज भाजपची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव असून सलग तिसऱ्यांदा मोदी वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं आहे. यादी जाहीर झाल्यानंतर यामध्ये 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांच्या नावाचा समावेश आहे.

भाजपच्या यादीत कोणाची नावे?

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्याची नावं आहेत. तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सलग तिसऱ्यांदा वाराणासीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या सोबतच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं आहे. तर अंदमान निकोबारमधून विष्णू पडारे, अरुणाचल प्रदेश वेस्टमधून किरण रिजीजू, अरुणाचल ईस्टमधून तापीर गांवता निवडणूक लढणार आहेत. दरम्यान, या वेळी विनोद तावडे म्हणाले की, 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांची यादी आज घोषित करण्यात येत आहे.

राज्यात किती उमेदवार?

भाजपची पहिली यादी जाहीर (PM Narendra Modi) झाल्यानंतर विनोद तावडे यांनी कोणत्या राज्यात कोणते उमेदवार निवडणूक लढवणार हे सांगितलं. या वेळी, पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 26, मध्यप्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, केरळमधील 12, तेलंगनातील 9, आसाममधील 14, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 5, जम्मू-काश्मीरमधील दोन, उत्तराखंडमधील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन, गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी एका उमेदवाराचं नाव आहे. परंतू या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, बाॅलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांना तिकिट देण्यात आलं आहे.

हेमा मालिनी यांना मथूरेतून तिकीट-

बाॅलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री यांचा देखील या यादीमध्ये समावेश असून, त्या मथूरामधून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. या वेळी अभिनेते मनोज तिवारी यांचं देखील यादीत नाव आलं आहे. मनोज तिवारी यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

News Title : pm narendra modi to contest from Varanasi

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपकडून चंद्रकांत पाटलांना लोकसभेची उमेदवारी, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?

एकाच दिवशी भाजपला सलग दोन मोठे झटके!

‘या’ तीन कामानंतर अंघोळ करणं आवश्यक, अन्यथा…

देशात खळबळ! राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

‘जग जिंकत होते, तेव्हा लोक म्हणाले संसार…’, सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत