क्रिकेटपटू युवराज सिंहची राजकारणात एंट्री?, स्वतःच केला खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Loksabha Election | आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. यासाठी भाजपसह सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून काही कलाकार आणि क्रिकेटपटू राजकारणात येणार, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. यात क्रिकेटपटू युवराज सिंहचे (Yuvraj Singh) नाव आघाडीवर आहे.

आता युवराज लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, याबाबत त्याने स्वतःच मोठा खुलासा केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवराज सिंग याची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हापासून तो भाजपाकडून लढणार अशा चर्चा रंगल्या होत्या.

युवराज सिंह Loksabha Election लढवणार

काही रिपोर्टनुसार युवराज सिंग पंजाबच्या गुरदासपूरमधून लोकसभेसाठी रिंगणात उतरणार आहे, असा दावा केला जात होता. याच जागेसाठी भाजपकडून सनी देओल याला उमेदवारी मिळाली होती. या चर्चेवर आता स्वतः युवराज सिंहने (Yuvraj Singh) पोस्ट करत खुलासा केला आहे.

“माझी राजकारणात येण्याची कोणतीच इच्छा नाही. मी समाजासाठी काम करू इच्छितो. त्यासाठी राजकारणात उतरण्याची गरज नाही. मीडिया रिपोर्ट चुकीचे आहेत. मी गुरूदासपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. मी लोकांची मदत करू इच्छितो. मी हे काम युवी कॅन फाउंडेशनच्या माध्यमातून करेन. आपल्या स्तरावर कोणला तरी असं करण्याची गरज आहे.”, अशी पोस्ट युवराजने केली आहे.

‘या’ क्रिकेटपटूचाही राजकारणातून संन्यास

या पोस्टमुळे युवराज (Yuvraj Singh) आता लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे क्रिकेटपटू गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्याने आजच (2 मार्च) पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

गौतम गंभीर आता राजकारणातून एक्जिट करणार आहे. मी आता क्रिकेटवरच लक्ष्य केंद्रीत करु इच्छितो असं गौतम गंभीरने पोस्ट करत म्हटलं आहे. मला सगळ्या राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, अशी मागणी त्याने भाजप श्रेष्ठीकडे केली आहे. “मी आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना विनंती केली आहे की, मला सगळ्या राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा. मी येणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर लक्ष केंद्रीत करु इच्छितो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी ऋणी आहे. तसंच अमित शाह यांनीही मला जी संधी दिली आणि लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो. जय हिंद!”, अशी पोस्ट गौतम गंभीरने केली आहे. गौतम गंभीरनंतर युवराज सिंहनेही हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या याचीच चर्चा होत आहे.

News Title : Yuvraj Singh will not contest Lok Sabha Election

महत्त्वाच्या बातम्या-

अभिनेता अक्षय कुमार करणार राजकारणात एंट्री, मतदारसंघही ठरला?

मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी समोर!

‘तो मला मारहाण करायचा’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप

अंबानींच्या लेकाच्या लग्नात ‘एवढ्या’ कोटींचा होणार खर्च; आकडा वाचून थक्क व्हाल

महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर ‘या’ चूका करू नका