मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचं अंतरवली सराटी गावात गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरु होतं. मराठा समाजाच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलंय. महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आल्यानंतरही ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशात त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी समोर आलीये.

जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. असं असताना त्यांची आज अचानक प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

आज अचानक छातीत दुखू लागल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती समोर आल्यानंतर मराठा समाजात काळजी व्यक्त केली जात आहे.

Manoj Jarange Patil | अचानक छातीत दुखू लागलं

अचानक छातीत दुखणे हे गंभीर आहे. मी सध्या इंजेक्शन आणि सलाईन लावले आहे. मात्र उपचाराला त्यांची साथ नाही. इथे केवळ प्राथमिक उपचार होतील. त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याची गरज आहे, अशी माहिती जरांगेंच्या डॉक्टरांनी दिली आहे.

जरांगेंचे पल्स सध्या चांगले आहेत. मात्र छातीत कशामुळे दुखत आहे, याची माहिती पुढील उपचारानंतर कळेल. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हलवावे लागेल, असं डॉक्टर म्हणालेत.

उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे मराठा समाजाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात होती. यादरम्यान त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईलादेखील निघाले होते. पण दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा जालन्याच्या अंतरवली सराटी गावात आले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘तो मला मारहाण करायचा’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप

अंबानींच्या लेकाच्या लग्नात ‘एवढ्या’ कोटींचा होणार खर्च; आकडा वाचून थक्क व्हाल

महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर ‘या’ चूका करू नका

‘अशा’ व्यक्तींकडे कितीही कमावले तरी पैसे टिकत नाही!

धक्काबुक्की का झाली?; महेंद्र थोरवेंनी सांगितलं खरं कारण