Anant-Radhika Marriage | जागतिक पातळीवरील आघाडीचे आणि नामवंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी यांची ओळख आहे. मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि त्यांची होणारी सून राधिका मर्चंट (Anant-Radhika Marriage) लवकरच विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत. त्यांचे सध्या प्री-वेडींग सुरू आहे. हा प्री-वेडींग सोहळा गुजरात येथील जामनगरमध्ये सुरू आहे. (Anant-Radhika Marriage)
प्री-वेडींग सोहळ्यासाठी उद्योगपती बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग
अंबानी कुटुंबातील विवाह सोहळा हा सोहळा नसून राजेशाही थाट असतो. कारण अंबानी कुटुंबातील विवाहामध्ये अनेकजण दिग्गज मंडळी येतात आणि ते वाडप्याचं काम करतात असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अशातच आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant-Radhika Marriage) हे गुजरातमधील जामनगर येथे गेले असून आपलं प्री-वेडींग शूट करत आहेत. यावेळी उद्योगपती बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग तसेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत.
जगातिल सर्वाधिक महागडा विवाह सोहळा
1 मार्चपासून ते 3 मार्च या कालावधीमध्ये त्यांचा विवाहपूर्व सोहळा पार पडणार आहे. जगातील महागडा विवाह सोहळा असणार असल्याच्या चर्चा आहेत. अनंत आणि राधिका त्यांच्या लग्नासाठी अमाप पैसे खर्च करणार आहे.
अनंत आणि राधिकाचा विवाह (Anant-Radhika Marriage) अंबानी कुटुंबातील सर्वाधिक महागडा विवाह सोहळा असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नासाठी तब्बल 1 हजार कोटी रूपये खर्च केला जाणार आहे.
ईशा अंबानी यांनी त्यांच्या लग्नामध्ये 90 कोटींचा लेहंगा परिधान केला होता. तसेच आता अनंत आणि राधिकाच्या विवाहासाठी तब्बल 1 हजार कोटी रूपये खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
1 कोटी इतका खर्च अनंत अंबानीच्या लग्नामध्ये केला जाणार आहे. तसेच अरिजीत सिंह देखील यामध्ये लाईव्ह शो करणार आहे. लग्नाचा बराचसा खर्च हा कपड्यांवर आणि लाईव्ह शोवर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
News Title – Anant Ambani And Radhika Marchant Marriage Cost
महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर ‘या’ चूका करू नका
‘अशा’ व्यक्तींकडे कितीही कमावले तरी पैसे टिकत नाही!
धक्काबुक्की का झाली?; महेंद्र थोरवेंनी सांगितलं खरं कारण
अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल