लोकसभेसाठी महाराष्ट्राच्या माजी गृहराज्यमंत्र्यांना उमेदवारी; भाजपने आखली रणनीती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BJP Lok Sabha Candidate List | भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीतून 195 उमेदवारांची नावं उघड झाली आहेत. (BJP first list of candidates) मात्र, या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. उत्तर प्रदेशातील 51 जागांसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. (UP BJP Candidates List 2024) इथे अनेकांना पुन्हा एकदा लोकसभेसाठी मैदानात उतरवण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपा शंकर सिंह यांना जौनपूरमधून तिकीट देण्यात आले आहे.

कृपाशंकर सिंह यांनी 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. ते मूळचे जौनपूरचे असून राजपूत समाजाचा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. कृपाशंकर हे मुंबईतील महत्त्वांच्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांची उत्तर भारतीय मतदारांवर पकड असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. कृपाशंकर सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील असून मुंबईतील उत्तर भारतीय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.

माजी गृहराज्यमंत्र्यांना उमेदवारी

कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. कृपाशंकर सिंह यांनी 2019 मध्ये काँग्रेसचा हात सोडला. जम्मू-काश्मीरबाबत एनडीएच्या धोरणाला विरोध केल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली होती. 2004 मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार असताना त्यांना महाराष्ट्रात मंत्री करण्यात आले होते.

मुंबईतील सांताक्रूझ भागातील ते आमदार राहिले आहेत. 2008 ते 2012 दरम्यान ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेस सोडल्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. भाजपने त्यांना गुजरातमधील 10 जिल्ह्यांचे प्रभारी बनवले होते.

BJP Lok Sabha Candidate List जाहीर

बहुजन समाजवादी पार्टीचे श्याम सिंह यादव सध्या जौनपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या कृष्ण प्रताप सिंह यांचा पराभव केला. श्यामसिंह यादव यांना 440192 मते मिळाली. 1999 मध्ये या जागेवरून भाजपने शेवटची निवडणूक जिंकली होती तेव्हा स्वामी चिन्मयानंद विजयी होऊन लोकसभेत गेले होते.

त्यानंतर समाजवादी पक्षाने एकदा निवडणूक जिंकली. त्यानंतर सलग तीन निवडणुकांमध्ये ही जागा मायावतींचा पक्ष बसपाकडे गेली. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांच्यावर बसपाचे मोठे आव्हान असणार आहे. मागील तीन टर्म निवडून आलेल्या बसपाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी भाजपने कृपाशंकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

News Title- BJP Lok Sabha Candidate List Former Maharashtra Home Minister Kripashankar Singh has been nominated from Jaunpur in Uttar Pradesh

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटपटू युवराज सिंहची राजकारणात एंट्री?, स्वतःच केला खुलासा

लोकसभेच्या तिकिटासाठी महाराष्ट्रातील 1 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार?

मोठी बातमी! सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वाराणसी’तून लढणार

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राचा उमेदवार, मात्र उत्तर प्रदेशातून लढणार!

भाजपकडून चंद्रकांत पाटलांना लोकसभेची उमेदवारी, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?