भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी ही यादी वाचून दाखवली. 195 नावांच्या यादीत भाजपने एकूण 34 मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपच्या या पहिल्याच यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नावाचा समावेश नाही, त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्यांची नावं या यादीत आहेत, मात्र केंद्रात मंत्री असलेल्या महाराष्ट्रातील गडकरींचा मात्र या यादीत समावेश नाही. महाराष्ट्रातील रोखठोक नेते अशी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची ओळख आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची काही वक्तव्ये चर्चेत आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नावाची घोषणा न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दरम्यान भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही.

दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे. 34 केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या यादीत 28 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढणार आहे. भाजपने पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 80 पैकी 51 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्येला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. बासुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी (BJP Candidate List) देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

क्रिकेटपटू युवराज सिंहची राजकारणात एंट्री?, स्वतःच केला खुलासा

लोकसभेच्या तिकिटासाठी महाराष्ट्रातील 1 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार?

मोठी बातमी! सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वाराणसी’तून लढणार

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राचा उमेदवार, मात्र उत्तर प्रदेशातून लढणार!

भाजपकडून चंद्रकांत पाटलांना लोकसभेची उमेदवारी, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?