किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ishan Kishan | बीसीसीआयने अलीकडेच वार्षिक करार यादी जाहीर केली. श्रेयस अय्यर आणि इशान किशन ही दोन नावे सध्या चर्चेत आहेत आणि त्यांना बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे. खरं तर देशांतर्गत क्रिकेटकडे कानाडोळा केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही क्रिकेटपटूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता आणि त्यामुळेच त्यांना केंद्रीय करार मिळाला नाही.

अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अय्यर आणि किशन यांच्याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना खास संदेश दिला आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अलीकडेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्यांना विचारण्यात आले की, आजकाल युवा खेळाडूंना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे का?

जय शाहंना दिला सल्ला

युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना गांगुलींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मी जर इशान किशन, बीसीसीआय सचिव जय शाह, विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि निवडकर्त्यांबद्दल बोललो तर त्यांच्याबद्दल मला थेटच बोलले पाहिजे. इशान बराच काळ रणजी ट्रॉफी आणि नंतर वन डे क्रिकेट खेळत आहे, यामुळे तो वाईट क्रिकेटर बनला आहे का? तर असे अजिबात नाही. खेळाडूंशी बोलणे गरजेचे आहे.

तसेच माझ्या मते, एखाद्या खेळाडूने लाल-बॉल देशांतर्गत क्रिकेट खेळले नाही किंवा तसे करण्यास नकार दिल्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. यामागे काय कारण आहे याच्या तळाशी जायला हवे. खेळाडू तंदुरूस्त असताना त्यांनी रणजी ट्रॉफीचे सामने खेळलेच पाहिजेत. मला आशा आहे की बीसीसीआय या मुद्द्यावर योग्य ती कारवाई करेल, असेही गांगुलींनी म्हटले.

Ishan Kishan ला करारातून वगळले

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सर्व खेळाडूंना कठोर आदेश दिले आहेत की, जेव्हा निवडकर्ते, प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्या नजरेत तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे, तेव्हा तुम्हाला खेळावेच लागेल आणि या विषयावर कोणतेही कारण खपवून घेतले जाणार नाही.

दरम्यान, करारातून वगळल्यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यर रणजी ट्रॉफी खेळत आहे. सध्या सुरू असलेल्या मुंबई आणि तामिळनाडू या सामन्याचा तो भाग आहे. मुंबईचा संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळत आहे, तर साई सुदर्शनकडे तामिळनाडूच्या संघाची धुरा आहे.

News Title- Former Team India skipper Sourav Ganguly has a piece of advice for Jai Shah and Roger Binny after Ishan Kishan and Shreyas Iyer were dropped from the contract by the BCCI
महत्त्वाच्या बातम्या –

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा

युझी चहलचा संगीता फोगाटसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांनी घेतली शाळा!

लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; 34 मंत्र्यांना उमेदवारी, गडकरींचे नाव प्रतीक्षेत

लोकसभेसाठी महाराष्ट्राच्या माजी गृहराज्यमंत्र्यांना उमेदवारी; भाजपने आखली रणनीती