…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lalu Prasad Yadav | बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तांतर झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव राज्यभर फिरत आहेत. बिहारमध्ये निघालेली तेजस्वी यादव यांची जनविश्वास यात्रा 3 मार्चला राजधानी पाटणा येथे पोहोचली. यादरम्यान पाटणा येथील गांधी मैदानावर भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव हे देखील पाटण्यातील गांधी मैदानात पोहोचले होते. यावेळी बोलताना लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.

यावेळी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यासह केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. तर दुसरीकडे लालू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. जनविश्वास रॅलीच्या पार्श्वभूमीवर पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित सभेत ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे हिंदू नाहीत कारण त्यांनी त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर मुंडन आणि दाढी केली नाही.

“नरेंद्र मोदी हिंदू नाहीत”

ते म्हणाले की, बिहारने अनेक महान व्यक्तिमत्त्व दिले आहेत. याच गांधी मैदानात देशभरातील नेत्यांनी रॅली आणि सभा घेतल्या आहेत. इथून संपूर्ण देशात एक संदेश गेला. बिहारच्या मतात इतकी ताकद आहे की बिहार जे काही करतो, त्याचे अनुकरण संपूर्ण देशभर केले जाते. उद्याही तेच होणार आहे.

तसेच राजा दशरथ यांचा मुलगा भगवान राम यांचा विवाह बिहारमधील जनकपूर येथे झाला. बिहारमध्ये अनेक शूर पुरुष जन्माला आले. या गांधी मैदानात अनेकवेळा देशभरातील नेत्यांच्या सभा झाल्या. इथे खूप काही आहे असा संदेश देण्यात आला. बिहारमधली सत्ता अशी आहे की इथे जो काही निर्णय घेतला जातो तो देशभरातील लोक पाळतात. त्यामुळे ही परिवर्तनाची खरी सुरू सुरूवात आहे, असेही लालू यादव म्हणाले.

Lalu Prasad Yadav यांची मोदींवर टीका

तेजस्वी यादव यांनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी सांगितले की, बिहार सरकारने स्वतःचा विमा उतरवला पाहिजे कारण जनता दल युनायटेडचे सुप्रिमो पुन्हा पुन्हा यू-टर्न घेण्याचा धोका आहे. ते भाजपवाले मोदींची गॅरंटी सांगतात, पण पण नितीश कुमारांची गॅरंटी कोण देणार? ते आम्हाला घराणेशाहीवरून बोलतात. मात्र, त्यांनी रामविलास पासवान यांचे बंधू सम्राट चौधरी, मांझीजींचे पुत्र यांना मंत्री केले आहे. ही त्यांना घराणेशाही वाटत नाही.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी बिहारमध्ये लालू यादवांची आरजेडी आणि काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे कळते. दोन्हीही पक्ष इंडिया आघाडीचे भाग आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत, त्यामुळे भाजपसह विरोधकांचे या राज्यावर लक्ष आहे.

News Title- Former Bihar Chief Minister and Rashtriya Janata Dal founder Lalu Prasad Yadav has criticized Prime Minister Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या –

लोकसभेचे तिकिट मिळताच भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; खासदाराची पोलिसात धाव

“अभिनेत्याच्या मुलाचं कौतुक होत होतं पण…”, सुशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर

मोठी बातमी | IPL 2024 च्या तोंडावर अशुभ घटना, गुजरातच्या ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा अपघात

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने मोठा गोंधळ, महाविकास आघाडीत झाली बिघाडी?