Sushant Singh Rajput | अभिनेता सुशात सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडकडे पाहण्याची सर्वसामान्यांची नजर बदलली. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अभिनेत्याने कोरोना काळात तणावाखाली जाऊन टोकाचे पाऊल उचलले. सुशांतच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ माजली पण अद्याप याचे कारण उघड झालेले नाही. अथवा कोणावर कारवाई देखील झाली नाही. चित्रपटसृष्टीत फार कमी वेळात चांगले स्थान मिळविणाऱ्या सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला.
सुशांतचा मृत्यू होऊन तीन वर्ष उलटली असली तरी आजही तो अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतो. अचानक तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीने केलेला खुलासा. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्याने अनेक उत्कृष्ट चित्रपट केले होते.
सुशांतची आत्महत्या अन्…
2020 मध्ये त्याने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी त्यांची बहीण श्वेता सिंग कीर्तीने एक मोठा खुलासा केला आहे. रणवीर अलाहाबादिया नावाच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत श्वेताने अनेक खुलासे केले आहेत. तिने एक खुलासा केला आहे, जेव्हा सुशांतचा ‘एमएस धोनी अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुशांतने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती.
दरम्यान, मुलाखतीत श्वेताला बॉलिवूडचे जग कसे आहे असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल सुशांत तुझ्याशी कधी बोलला होता का? यावर श्वेता म्हणाली की, याचा माझ्यावर परिणाम होतो. मला आठवते की, जेव्हा महेंद्रसिंग धोनीचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचवेळी एका अभिनेत्याच्या मुलाचाही चित्रपट प्रदर्शित झाला होता. सर्वजण त्या चित्रपटाचे कौतुक करत होते आणि सोशल मीडियावर त्याबद्दल लिहित होते. पण माझ्या भावाबद्दल फारसे कुणी लिहीत नव्हते. या सर्व गोष्टी आठवल्या की त्रास होतो.
Sushant Singh Rajput च्या बहिणीचा खुलासा
तसेच तुम्ही समजू शकता की जर तुम्ही आतून लहान मुलासारखे असाल, तुम्ही काही चांगले केले असेल तर लोकांनी तुमची प्रशंसा करावी अशी तुमची इच्छा असते, जेणेकरून तुम्हाला चांगले वाटेल. प्रोत्साहन मिळेल. पण सुशांतला बॉलिवूडच्या जगाने यासाठी कधी स्वीकारलेच नाही याची खंत वाटते.
श्वेताने आणखी सांगितले की, ‘एमएस धोनी’चा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती भारतात आली होती. सगळे घरात बसले होते. त्यानंतर सुशांतने तिला त्या अभिनेत्याच्या मुलाच्या चित्रपटाबद्दल सांगितले. त्या अभिनेत्याच्या मुलाचा चित्रपट चांगला चालत नसल्याचेही सुशांतने सांगितले होते.
News Title- Sushant Singh Rajput’s sister Shweta Singh Keerti has made a big revelation about Bollywood
महत्त्वाच्या बातम्या –
IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर
मोठी बातमी | IPL 2024 च्या तोंडावर अशुभ घटना, गुजरातच्या ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा अपघात
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने मोठा गोंधळ, महाविकास आघाडीत झाली बिघाडी?
“यांनी पार माझी पोरं सोडली नाहीत…,” भर सभेत सुप्रिया सुळे यांनी सांगितलं असं काही…
‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर डिस्काऊंट, अगदी ‘एवढ्या’ किंमतीत करता येणार खरेदी