IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरूवात होणार आहे. (IPL 2024) 22 मार्चला सलामीचा सामना खेळवला जाईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल 2024 ला 22 मार्चपासून सुरूवात होत आहे. आयपीएलचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे.

सध्या पहिल्या टप्प्यात 7 एप्रिलपर्यंत 17 दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ 22 मार्च रोजी RCB विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. मात्र याआधीच चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

धोनीच्या CSK ला मोठा धक्का

सध्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे या मालिकेतील पहिला सामना खेळू शकला नाही. माहितीनुसार, आता तो दुसऱ्या कसोटी सामन्यातून देखील बाहेर झाला आहे. कॉनवेची दुखापत संघासाठी डोकेदुखी ठरली असून तो आयपीएलमधूनही बाहेर झाला आहे. ‘क्रिकबज’ने दिलेल्या वृत्तानुसार, डेव्हॉन कॉनवे त्याच्या डाव्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करणार आहे, ज्यामुळे त्याला किमान आठ आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागेल.

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने डेव्हॉन कॉनवेला 1 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याला स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. त्याने चेन्नईच्या संघासाठी अनेक सामन्यात मॅचविनिंग खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडसोबत कॉनवे चेन्नईसाठी सलामीवीर म्हणून प्रतिनिधित्व करतो.

IPL 2024 22 मार्चपासून

डेव्हॉन कॉनवेने आयपीएल 2022 च्या 7 सामन्यात 252 धावा केल्या होत्या. याशिवाय आयपीएल 2023 च्या 16 सामन्यांमध्ये त्याला 672 धावा करण्यात यश आले. आयपीएल 2023 मध्ये त्याने CSK संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मागील हंगामात सीएसकेने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला होता. चेन्नईकडे धोनीसारखा दिग्गज कर्णधार आहे. याशिवाय रवींद्र जडेजा आणि मोईन अलीसारखे स्टार अष्टपैलू खेळाडू आहेत.

News Title- New Zealand’s star player Devon Conway has been ruled out of IPL 2024 due to surgery
महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी | IPL 2024 च्या तोंडावर अशुभ घटना, गुजरातच्या ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा अपघात

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने मोठा गोंधळ, महाविकास आघाडीत झाली बिघाडी?

“यांनी पार माझी पोरं सोडली नाहीत…,” भर सभेत सुप्रिया सुळे यांनी सांगितलं असं काही…

‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर डिस्काऊंट, अगदी ‘एवढ्या’ किंमतीत करता येणार खरेदी

गणपत गायकवाड यांच्या पत्नी विधानसभा निवडणूक लढणार?