गणपत गायकवाड यांच्या पत्नी विधानसभा निवडणूक लढणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ganpat Gaikwad | लोकसभेनंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या पत्नी सुलभा गायकवाड राजकीय क्षेत्रामध्ये अॅक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी ते आता तळोजा जेलमध्ये आहेत. त्यानंतर त्यांचा मुलगा वैभव गायकवाड हा फरार आहे. यानंतर आता गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या पत्नी राजकारणामध्ये येणार असल्याच्या चर्चा आहेत.

विकासकामांची पाहणी-

महिन्याभरापूर्वी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शहरप्रमुखावर गोळीबार केला होता. यामुळे कल्याण हादरून गेलं होतं. त्यानंतर आता भाजपकडून कोण उमेदवार असणार? असा संभ्रम कल्याण पूर्व मतदारसंघामध्ये पाहायला मिळत होता. यावेळी गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी जात विकासकामांची पाहणी करत आहेत.

कल्याण मतदारसंघामध्ये सुलभा यांनी विकासकामांची पाहणी करत विकासकामांचे उद्घाटनही केलं आहे. यामुळे आता भाजपच्या कल्याण पूर्व मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. विकासकामाच्या भूमीपूजनाचे काम हे सुलभा गायकवाड यांनी केलं आहे.

उमेदवारी मिळवणार का?

कल्याणपूर्व मतदारसंघामध्ये चिंचपाडामध्ये विकासकामांचे भूमीपूजन केलं आणि त्यावेळी गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शनही केलं आहे. घोषणाबाजीही करण्यात आली आहे.

सुलभा गायकवाड यांचं जोसीबीचा वापर करत फुलांची उधळण करत फटाके वाजवत स्वागत केलं आहे. आता आगामी विधानसभेसाठी गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्ण मतदारसंघातून उमेदवारी मिळवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

News Title – Ganpat Gaikwad Wife Will enter in political

महत्त्वाच्या बातम्या

चहल-धनश्रीमध्ये का रे दुरावा? नेटकऱ्यांनी लावला तर्क; ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो व्हायरल

लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा

किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा