‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर डिस्काऊंट, अगदी ‘एवढ्या’ किंमतीत करता येणार खरेदी

Ola Electrical Scooter | इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electrical Scooter) ही काळाची गरज आहे. याचा फायदा हा आता शहराप्रमाणे ग्रामीण भागामध्ये वापर वाढला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना पेट्रोलचं टेन्शन कारण इलेक्ट्रिक स्कूटरला पेट्रोलची आवश्यकता नसते. वीजेवर चालणारी स्कूटर ही एखाद्या पेट्रोलच्या खर्चाहून कमी खर्चिक असते. Ola S1 असं त्या स्कूटरचं नाव असून या इलेक्ट्रिक गाडीवर बंपर सूट आहे. (Ola Electrical Scooter)

Ola S1 इलेक्ट्रिकल स्कूटर बंपर ऑफर

Ola S1 ही स्कूटर खरेदी करण्यासाठी 31 मार्च हा दिवस शेवटचा दिवस आहे. कारण या दिवसापर्यंत (Ola Electrical Scooter) ही स्कूटर विकत घेण्यासाठी बंपर ऑफर आहे. या स्कूटर खरेदीवर वाढीव वॉरंटी देखील देण्यात आली आहे. यामुळे तब्बल 25 हजार रूपयांची बचत होणार असून डिस्काऊंट देखील देण्यात येणार आहे.

Ola S1 ही इलेक्ट्रिकल स्कूटर वाढीव डिस्काऊंट देते. अतिरिक्त शुल्काशिवाय 8 वर्षे 80,000 किमीची वाढीव वॉरंटी देण्यात येणार आहे. कंपनी आणि त्यांच्या सेवा केंद्राचा विस्तार केला जात आहे. त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. तेव्हा कंपनीचे 414 सर्व्हिस सेंटर आहेत. या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्यात येते. (Ola Electrical Scooter)

Ola स्कूटरची किंमत

Ola S1 Pro Gen 2 : या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर ही 1.29 लाख रूपयांमध्ये मिळेल. ग्राहकांना या स्कूटरवर 17,500 रूपये बचत करता येतील.

Ola S1 Air : ही इलेक्ट्रिक स्कूटर ही 1.19 लाख रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. याच वाहनाची आताची किंमत 1.04 लाख आहे.

Ola S1 X+ : या स्कूटरची किंमत ही 1.09 लाख होती. आता याच स्कूटरची किंमत ही 84,999 रूपये आहे.  25,000 रूपयांच्या सवलीतीसह ही स्कूटर सवलतीसह विकत घेता येणार आहे.

News Title – Ola Electrical Scooter News update

महत्त्वाच्या बातम्या

चहल-धनश्रीमध्ये का रे दुरावा? नेटकऱ्यांनी लावला तर्क; ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो व्हायरल

लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा

किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा