‘माझी मान कापली तरीही…’; मनोज जरांगे पाटील चांगलेच भडकले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी सोलापूरमध्ये जात उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या नाहीतर फडणवीस साहेब मराठा सुपडासाफ करून ठेवतील असा हल्ला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.

“63 लाख नोंदी सापडल्या”

ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी शोधल्या आहेत. सुरूवातील या कुणबी प्रमाणपत्राच्या 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यानंतर 63 लाख नोंदी सापडल्या असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. तसेच यामुळे आता 1 कोटी रूपये मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी एक समिती गठीत केली होती. शिंदे समितीने आतापर्यंत 63 लाख कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत अशी महिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

निवडणुकीत तुम्हाला मराठे लागतात त्या नेत्यांवर बोललं की सगळेच तुटून पडतात. पण जर तुझ्या नेत्याने टांगा पलटी केल्यावर काय करणार? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. गोरगरीब मराठ्यांची मुलं देखील मोठी झाली पाहिजेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

“मला जेलमध्ये घातलं तरीही मी तिथेही आरक्षण करेल”

सत्ता आणि मराठा आरक्षणातील काटा म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे. त्याला दूर करा, गुंतवा असं धोरण त्यांनी आखलं आहे. मला जेलमध्ये घातलं तरीही मी तिथेही आंदोलन करेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

धनगर, मुस्लिम यांनाही सोबत घेईल. माझी मान कापली तरीही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. मी आई बापाला बाजूला केलं आहे. मला या समाजाने आई बापाची आठवण येऊ दिली नाही, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पुन्हा पाऊस बरसणार!

“बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर…”, मनोज जरांगे यांच्या ‘संघर्षयोद्धा’चा टीझर रिलीज

अनंत अंबानींच्या घड्याळाची मार्क झुकरबर्गच्या पत्नीला पडली भुरळ, व्हिडीओ तूफान व्हायरल

मनोज जरांगे पाटील यांनी काढली फडणवीसांची लाज, म्हणाले…

पोस्ट ऑफिसची महिलांसाठी जबरदस्त योजना; होईल फायदाच फायदा