पोस्ट ऑफिसची महिलांसाठी जबरदस्त योजना; होईल फायदाच फायदा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Post Office Scheme | आता बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या काही योजना (Post Office Scheme) महिलांसाठी फायदेशीर ठरत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाही. म्हणून अनेकजण आपापल्या फायद्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये विविध योजनांमध्ये (Post Office Scheme) पैसे गुंतवताना दिसत आहे.

पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये विश्वासार्हता असते. गुंतवलेले हे पैसे बुडीत नसतात. यामुळे देशातील असंख्य नागरिकांचा कल हा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये (Post Office Scheme) पैसे गुंतवण्याकडे असतो. लहान मुलं, मुली तसेच महिलांसाठी देखील या योजनांचा (Post Office Scheme) फायदा होताना दिसतो.

2 लाखांपर्यंत करू शकता गुंतवणूक

आपल्या मुलीसाठी, आईसाठी आणि आपल्या पत्नीसाठी पोस्ट ऑफिसची एक योजना फारच फायदेशीर आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानं गुंतवणुकीमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी व्याजदर हे 7.5 टक्के आहे. तर आपण यामध्ये जास्तीत जास्त 2 लाख रूपये भरू शकता. आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो.

ज्या महिलांचं वय हे 10 वर्षाहून अधिक आहे अशा महिला आणि मुली पैसे गुंतवू शकतात. या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यास सरकार कर सवलत देते. याचा महिला गुंतवणूकदरास फायदा होतोय. यामुळे महिला स्वावलंबी होताना दिसतात.

योजनेचा घसघशीत परतावा

या योजनेला व्याजदर हे 7.5 टक्के असल्याने या योजनेतून घसघशीत परतावा मिळत आहे. जर आपण दोन लाख रूपये गुंतवणूक केले तर त्यातून पहिल्या वर्षी 15 हजार रूपये व्याज मिळेल. तर दुसऱ्या वर्षी 16 हजार 125 रूपये व्याजदर मिळेल. म्हणजेच एकूण 31 हजार 125 रूपये व्याज मिळेल.

या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर एका वर्षानंतर आपण 40 टक्के गुंतवलेली रक्कम काढू शकता. म्हणजेच तुम्ही 2 लाख रूपये गुंतवले आहेत. तर तुम्ही 80 हजार रूपये काढू शकता.

News Title – Post Office Scheme News Update

महत्त्वाच्या बातम्या

“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!

…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका

लोकसभेचे तिकिट मिळताच भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; खासदाराची पोलिसात धाव

“अभिनेत्याच्या मुलाचं कौतुक होत होतं पण…”, सुशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर