बीडकरांसाठी धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Zaheer Khan | आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनीधी आपल्या तालुक्यात तसेच जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करताना दिसत आहेत. बीडमध्ये अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे हे विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींना आपल्या विभागामध्ये निमंत्रित करतात. आता बीडमध्ये सुरू असलेल्य़ा एका टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे माजी खेळाडू (Zaheer Khan) जहिर खान (Zaheer Khan) आणि युवराज सिंह यांना निमंत्रित केलं असून मुंडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

25 जानेवारीपासून नामदार चषक डे-नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा पार पडल्या आहेत. त्यांचा अंतिम सामना देखील पार पडला. या अंतिम सामन्याच्या शेवटी भारतीय क्रिकेटर (Zaheer Khan) जहिर खान आणि युवराज सिंह यांना निमंत्रण दिलं होतं. त्यांनीही निमंत्रणाला मान देऊन आपली उपस्थिती दर्शवली आहे. या स्पर्धेचा बक्षिस समारंभ पार पडला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी परळी आणि बीड जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटपटूंसाठी मोठी घोषणा केली आहे.

जिल्ह्यातील तब्बल 3500 खेळाडूहून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. येणाऱ्या वर्षामध्ये परळी प्रीमिअर लीग भरवण्यात येणार आहे. त्यामध्ये निवडक एकूण 700 खेळाडू खेळवण्यात येतील असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. यासह त्यांनी बीडकरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मोठं क्रिडासंकुल आणि स्टेडियम बांधण्याची घोषणा केली आहे. (Zaheer Khan)

धनंजय मुडेंची मोठी घोषणा

तब्बल 65 कोटी रूपये खर्च करून धनंजय मुंडे स्टेडियम आणि क्रिडासंकुल बांधणार आहेत. यामुळे येत्या काही वर्षांमध्ये मराठवाड्यातील खेळाडूंना देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते. यासाठी त्यांनी स्टेडियम बांधण्याची घोषणा केली आहे.

यावेळी बोलत असताना मुंडे यांनी युवराज सिंहचं कौतुक केलं आहे. कॅन्सरवर मात करून अनेक रेकॉर्ड स्थापित केले आहेत. ते पहिल्यांदाच परळीमध्ये आले. त्यांना प्रभू वेद्यनाथांच्या चरणी उदंड आयुष्य लाभो, अशी देवाकडे मुंडे यांनी प्रार्थना केली.

जहिर खानने सांगितला आपल्या आठवणीतील किस्सा

यानंतर जहिर खानने आपली भावना व्यक्त केली आहे. मी अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूरमधूनच टेनिस क्रिकेटची सुरूवात केली आहे. आता मी परळीत आलो आणि भव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहिल्यावर असं वाटलं की ही स्पर्धा देशाबाहेर जाईल, असं जहिर खान म्हणाला.

News Title – Zaheer Khan yuvraj singh Attend beed tennis cricket tournament

महत्त्वाच्या बातम्या 

‘अडीचशेच्या पार तुम्ही आमच्या खासदारांमुळे गेला होता’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

“वादग्रस्त वक्तव्ये टाळा, कारण हे जग…”, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचा मंत्र्यांना कानमंत्र

शाहरुख खानने दिला जय श्रीरामचा नारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?; पोलिस उपनिरीक्षक असल्याचं सांगत केलं धक्कादायक कृत्य

मुलगा अनंत अंबानीचं हृदयस्पर्शी भाषण; ‘बापमाणूस’ मुकेश अंबानींना अश्रू अनावर!