“वादग्रस्त वक्तव्ये टाळा, कारण हे जग…”, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचा मंत्र्यांना कानमंत्र

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Modi | 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले की, जेव्हाही ते मतदारसंघात जातील, विशेषत: निवडणुकीच्या वेळी तेव्हा त्यांनी काळजीपूर्वक बोलावे आणि विचारपूर्वक बोलावे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अद्याप एकही जागा जाहीर झालेली नाही. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मोदींनी मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कृपया कोणतेही विधान करण्यापूर्वी काळजी घ्या. हल्ली डीपफेकचा ट्रेंड आहे त्यात आवाज वगैरे बदलता येतात, काळजी घ्या. हे जग डीपफेकचे आहे. आवाज बदलून सोशल मीडियावर काहीही व्हायरल केले जाऊ शकते. सतर्क राहणे ही आपली जबाबदारी आहे.

मोदींचा मंत्र्यांना कानमंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना वादग्रस्त बोलणे टाळा आणि विचारपूर्वक बोला असे सांगितले. ही बैठक सुमारे 8 तास चालली. डीपफेकबाबत सर्वांनी सतर्क राहायला हवे. यावेळी जूनमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात विकसित भारताची झलक दिसली पाहिजे, असेही ते म्हणाले.

तसेच तुम्हाला बोलायचे असेल तर योजनांवर बोला, वादग्रस्त वक्तव्ये टाळा. निवडणुका आहेत, कोणाला भेटताय, याचीही काळजी घ्या. AI चा अधिक चांगला वापर करा. 2047 पर्यंत विकसनशील भारतासाठी नियोजन करणे हे उच्च प्राधान्य आहे. ही उच्च प्राधान्य असलेली बैठक आहे, असेही मोदींनी सांगितले.

Narendra Modi यांच्या सूचना

रविवारी झालेल्या बैठकीत आलेले सादरीकरण आणि सूचना पंतप्रधानांनी सचिवांना सांगितल्या. त्यावर लवकरच काम सुरू व्हायला हवे. न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांबाबत अमित शाह यांनी सचिवांना सांगितले की, न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात. याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी, राजनाथ सिंह लखनौ आणि अमित शाह गांधीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत.

News Title- Prime Minister Narendra Modi guided the ministers in the background of the Lok Sabha elections
महत्त्वाच्या बातम्या –

शाहरुख खानने दिला जय श्रीरामचा नारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?; पोलिस उपनिरीक्षक असल्याचं सांगत केलं धक्कादायक कृत्य

मुलगा अनंत अंबानीचं हृदयस्पर्शी भाषण; ‘बापमाणूस’ मुकेश अंबानींना अश्रू अनावर!

“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!

…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका