‘अडीचशेच्या पार तुम्ही आमच्या खासदारांमुळे गेला होता’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | आगामी लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका करणं सुरू आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष फोडला तसेच काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण यांना देखील आपल्या बाजूने वळून घेतलं आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीकेची तोफ डागली आहे.

धारावीमध्ये ठाकरे गटाची सभा झाली. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत कान टोचले आहेत. याआधी नरेंद्र मोदी आणि भाजपने आपकी बार मोदी सरकार असा नारा लावला होता. त्यानंतर अच्छे दिन आऐंगे असा नारा लावला होता. मात्र अच्छे दिन आलेच नाहीत, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी अब की बार भाजप तडीपार असा नारा लावला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

धारावीच्या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भाजपने शहरांची आणि स्थळांची नावे बदलण्याऐवजी काही केलं नाही. अच्छे दिन आऐंगे म्हणत होते, मग अच्छे दिन आलेच नाहीत. आता भाजप गॉरंटी हा एक जुमलाच आहे. अडीचशेच्या पार तुम्ही आमच्या खासदारांमुळे गेला होता. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली.

“अबकी बार भाजप तडीपार”

अब की बार मोदी सरकार हे गेल्या काही वर्षांआधीच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारासाठी वापरलं गेलेलं टॅगलाईन होतं. मात्र आता त्याचाच उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी अबकी बार भाजप तडीपार, असं म्हणत भाजपवर सडकून टीका केली आहे.

त्यांनी काहीही कामं केली नाहीत, केवळ योजनांची नावं बदलली आहे. आम्ही त्यांच्या दोनदा भूलथापांना बळी पडलो. शेवटी पदरात काय पडले धोंडे. धोंड्यांना तरी शेंदूर फासता येतो आणि देव करता येते. आता त्यांनी जुमल्याचं नाव गॉरंटी ठेवलं आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

“नितीन गडकरी यांनी 55 उड्डणपुल बांधले…”

नितीन गडकरी यांनी 55 उड्डणपुल बांधले आहेत. संघाचे निष्ठावंत आहेत. प्रमोद महाजन यांच्यामुळे मला मोदी माहिती पडले. त्यानंतर गडकरी आले. पण भाजपच्या पहिल्या यादीमध्ये मोदी शहाचं नाव आहे. पण गडकरी याचं नाव नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

 News Title – Uddhav Thackeray On Narendra Modi And BJP

महत्त्वाच्या बातम्या

चहल-धनश्रीमध्ये का रे दुरावा? नेटकऱ्यांनी लावला तर्क; ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो व्हायरल

लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा

किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा