मनोज जरांगेंनी फडणवीस यांना दिली आत्याची उपमा, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करताना दिसत आहेत. मराठा समाजाला सरकारने 10 टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मनोज जरांगे आरोप करण्यापासून थांबत नाहीत.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा मिश्कील टीप्पणी केली आहे. त्यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांना आत्याची उपमा दिली आहे. यामुळे आणखी वाद पेटण्याची शक्यता असून जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं टीका करणं सुरूच आहे.

फडणवीस यांना आत्याची उपमा   

माझी हत्या करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे. माझ्या अंगावर कार्यकर्ते घालण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होतो. पोलिसांना हाताशी धरून त्यांचे कान भरण्याचे काम फडणवीस यांच्याकडून होत आहे. पूर्वी मुलं जन्माला आली की आत्या त्यांची कान फुंकायची, अशी मिश्कील टीप्पणी करत जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीये.

काय म्हणाले मनोज जरांगे?

देवेंद्र फडणवीस यांनी एसपींचे कान फुंकले आहेत. पीआय, पीएसआय यांचे कान फुंकले आहेत. गृहमंत्री हे जबाबदारीचे पद आहे. पूर्वी ग्रामीण भागामध्ये आत्या जन्मलेल्या मुलाचे कान फुंकायची आता आत्याच्या भूमिकेत फडणवीस आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले.

पुन्हा आंदोलनाचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 8 ते 9 तारखेपर्यंत सरकारची वाट बघणार आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली तर ठीक नाहीतर पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचं बोललं जात आहे.

माझ्यावर हल्ला केला जात आहे. त्यांना किती दडपशाही करायची आहे ती करू दे. कार्यकर्ते आणि महिलांच्या आडून दडपशाही केली जात आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News Title – Manoj Jarange Patil Tount To Devendra Fadanvis

महत्त्वाच्या बातम्या 

चहल-धनश्रीमध्ये का रे दुरावा? नेटकऱ्यांनी लावला तर्क; ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो व्हायरल

लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा

किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा