यशस्वी व्हायचं असेल तर अशा लोकांपासून चार हात लांबच राहा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | चाणक्यनीती (Chanakya Niti) माणसाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. माणसाला आपल्या आयुष्यामध्ये वर्तवणुक करायचं कसे हे माहिती नसतं. मात्र चाणक्यनीतीची (Chanakya Niti) शिकवण सामान्यांनी अंगिकारल्यास सामान्य माणसाला त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये यशाच्या शिखरावर जाणं सोईचं होऊन जातं. मित्र शत्रू, नातेसंबंध, पैसे, कष्ट या इतर बाबींवर चाणक्य (Chanakya Niti) अभ्यासपूर्ण माहिती देत असतात. आपण त्यापैकी एखाद मुद्दा जरी फॉलो केला तरी आपल्या आयुष्याला भरभराटी मिळू शकते. यावर आता चाणक्यांनी (Chanakya Niti) आयुष्यात पुढं जायचं असेल तर अशा काही लोकांपासून चार हात लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.

अशा लोकांपासून लांब राहा 

अनेकदा आपल्या संकटकाळात जो व्यक्ति साथ देतो अशा व्यक्तींना नेहमी आपल्या आयुष्यामध्ये किंमत असते. जो व्यक्ती आपल्यापासून लांब असतो तसेच आपल्या परिस्थितीवर हसत असतो अशा लोकांना चार हात लांब ठेवणं बरं असतं. तोंडावर गोड बोलून मागे निंदा करणाऱ्यांना लांब ठेवावं कारण अशी लोकं आपल्याला धोकादायक असू शकतात.

चोमड्यांपासून लांब राहा

आपल्याला अनेकदा वाटतं की आपल्या मनातील काही गोष्टी इतरांना शेअर केल्यानं मन हलकं होतं. मात्र तसं नाही आपण सांगितलेल्या गोष्टींचा काही लोकं गैरफायदा घेतात. त्यामुळे एखादं गुपित कधीही उघडे पडण्याची शक्यता वर्तवली जाते. अशा लोकांपासून लांबच राहिलेलं बरं असतं, अशी आचार्य चाणक्यांची शिकवण आहे.

अनेकदा काही लोकं ही त्रासदायक ठरू शकतात. काही लोकं जर जाणूनबुजून त्रास देत असतील तर त्यांना ताबडतोब आपल्यापासून लांब करा असं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे. अशी लोकं तुम्हाला कधीही अडचणीत आणू शकतील. तुमचे नुकसान करू शकतात.

स्वार्थी लोकांपासून लांब राहा

स्वार्थी लोकांपासून नेहमी लांब राहिलं पाहिजे असं चाणक्यनीती सांगते. स्वार्थी लोकं हा त्यांचा स्वत:चा स्वार्थ साधू शकतात. ते स्वत:चा विचार करतात. इतरांचा ते विचार करत नाहीत. म्हणून चाणक्यांनी अशा लोकांपासून चार हात लांब राहण्यासाठी सांगितलं आहे. अशी लोकं दिलदार नसतात म्हणून आपल्यासाठी अशी लोकं धोकादायक असतात.

आचार्य चाणक्य नेहमी मानवाच्या आयुष्याला वळण देतात. मानवाने आचरण, विचार कसं असावं याची ती सदैव माहिती देत असतात. मनुष्याने त्यांच्या विचारांचे आचरण केलं तर मनुष्य आपल्या आयुष्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतो.

News Title – Chanakya Niti Follow Tips For Achieved Success

महत्त्वाच्या बातम्या

चहल-धनश्रीमध्ये का रे दुरावा? नेटकऱ्यांनी लावला तर्क; ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो व्हायरल

लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा

किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा