शाहरुख खानने दिला जय श्रीरामचा नारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shahrukh Khan | देशातील नव्हे तर जगभरातील श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी यांची चर्चा आहे. त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि त्यांची होणारी सून राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला आहे. यासोहळ्यामध्ये दिग्गजांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये बॉलिवूडसोबतच हॉलिवूडचे काही स्टार्स यांनी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये जे काही घडलं आहे त्याची सर्वत्र चर्चा आहे. (ShahruKh Khan)

प्री-वेडिंग शूटसाठी दिग्गजांची हजेरी

मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स यांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. हॉलिवूडमधील रिहाना यांनी आपला परफॉर्मन्स करत कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. अंबानी कुटुंबाचा लग्नसोहळा म्हणजे राजेशाही थाटच जणू. या सोहळ्यातील जेवणामध्ये 2500 हून अधिक पदार्थ होते. तसेच पाहुण्यांसाठी बेडरूम आणि हॉलची सुविधा करण्यात आली होती. (Shahrukh Khan)

सकाळपासून सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग विवाह सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यासोहळ्यामध्ये बॉलिवूडच्या (Shahrukh Khan) किंग खानने म्हणजेच शाहरूख खानने (Shahrukh Khan) सूत्रसंचालन केलं आहे. यावेळी बोलत असताना त्यांने जय श्रीरामचा नारा लगावला आहे.

शाहरूख खानकडून जय श्रीरामचा नारा

व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरूख खान हा सूत्रसंचालन करताना दिसत आहे. त्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. सूत्रसंचालन करत असताना त्याने जय श्रीराम नारा लगावला आहे. कोणतंही शुभ काम करत असताना देवाचं नाव घ्यायला हवं असं शाहरूखने सूत्रसंचालन करत असताना कार्यक्रमाला संबोधित केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.


यावेळी प्री-वेडिंग शुट सोहळ्याला दिग्गजांनी उपस्थिती लावली असून तीन खान देखील यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासह इतर बॉलिवूडकर गाण्यावर थिरकले आहेत.

अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला तब्बल 1 हजार कोटी रूपये इतका खर्च झाला आहे. ही रक्कम मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीतील 0.1 टक्के आहे.

News Title – Shahrukh Khan Jay Shree Ram viral video

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी | IPL 2024 च्या तोंडावर अशुभ घटना, गुजरातच्या ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा अपघात

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने मोठा गोंधळ, महाविकास आघाडीत झाली बिघाडी?

“यांनी पार माझी पोरं सोडली नाहीत…,” भर सभेत सुप्रिया सुळे यांनी सांगितलं असं काही…

‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर डिस्काऊंट, अगदी ‘एवढ्या’ किंमतीत करता येणार खरेदी

गणपत गायकवाड यांच्या पत्नी विधानसभा निवडणूक लढणार?