महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पुन्हा पाऊस बरसणार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather news | राज्यातील वातावरणामध्ये गेल्या आठवड्यापासून अचानक बदल होत आहेत. विदर्भ आणि खान्देशात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. मराठवाड्यामध्येही काही भागात पाऊस (Weather news) पडला. आज (4 मार्च) पुन्हा काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गारपीट आणि पावसामुळे शेतातील रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आकाश अंशतः ढगाळ राहिल्याने मुंबईतील तापमानात घट झाली आहे. कुलाब्यात 23.3 आणि सातांक्रुजमध्ये 24.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

यासोबतच राज्याच्या किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडी वाढली आहे. पहाटे आणि रात्री थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबई, पुणे शहरात गारवा जाणवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘या’ भागाला अलर्ट

आज काही भागामध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.अकोल, अमरावती, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. यासोबतच मुंबईमध्येही आज हलका पाऊस पडू शकतो.त्यामुळे राज्यात आज (Weather news) अलर्ट देण्यात आला आहे.

तापमानामध्ये घट झाल्याने गारवा वाढला

उत्तर भारतात पश्चिम विक्षोप म्हणजे उत्तरेकडून येणारा थंड हवेचा झंझावात सक्रिय आहे. हा प्रवाह अरबी समुद्रावरून मुंबईसह किनारपट्टीवर पोहोचला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर थंड वारे वाहत असून, हवेत बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गारवा जाणवत आहे. पहाटे थंडी जाणवू लागली आहे.

थंडीसोबतच पावसाचा इशाराही (Weather news) हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजूनच भर पडली आहे. अवकाळी आणि गरपीटीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. आता पुन्हा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

News Title- Weather news It will rain in some areas today

महत्त्वाच्या बातम्या –

“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!

…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका

लोकसभेचे तिकिट मिळताच भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; खासदाराची पोलिसात धाव

“अभिनेत्याच्या मुलाचं कौतुक होत होतं पण…”, सुशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर