घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्याची कुटुंबासोबत धमाल; व्हिडीओ तूफान व्हायरल

Aishwarya Rai spotted with family

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. पाहायला गेलं तर, बच्चन कुटुंबातील कुणीच यावर अधिकृत अशी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, माध्यमामध्ये लवकरच ऐश्वर्या अभिषेकपासून विभक्त होणार, असं वृत्त झळकून आलं आहे. मात्र, ऐश्वर्याला (Aishwarya Rai) अनेक कार्यक्रमांमध्ये कुटुंबासोबत पाहण्यात आलं.

नुकतीच ऐश्वर्या आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये दिसून आली. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील असंख्य सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्यात बच्चन कुटुंब देखील संपूर्ण परिवारासह येथे उपस्थित होतं.

अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला बच्चन कुटुंबाची हजेरी

अगोदरच्या दोन दिवशी कार्यक्रमात बच्चन कुटुंब नसल्याने चर्चा होत होती, पण तिसऱ्या दिवशी ते जामनगरला अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगला पोहोचले. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) व लेक आराध्या, श्वेता बच्चन नंदा आणि तिची मुलं अगस्त्य व नव्या नवेली या सर्वांचा जामनगरमधील एकत्र व्हिडीओ समोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कार्यक्रमात बच्चन कुटुंबियांनी अत्यंत सुंदर असे पारंपारिक पोशाख परिधान केले होते. त्यांचे कार्यक्रमातील व्हिडिओ देखील समोर आले आहेत.या व्हिडीओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या हे मुलगी आराध्यासोबत बसलेले दिसत आहेत. कार्यक्रमातील गाण्यांवर हे तिघं धमाल करताना दिसून येत आहेत.

ऐश्वर्याची कुटुंबासोबत धमाल

यावेळी आराध्या बच्चन वेगळ्या लुकमध्ये दिसून आली. या व्हिडिओवर चाहतेदेखील प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी आराध्याच्या बदललेल्या हेअरस्टाइलवरून कमेंट केली. ‘आराध्याला शाळा नसते का, तिला इतक्या सुट्ट्या कशा मिळतात’, असा सवालही काहींनी केला. आराध्याला अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत विविध कार्यक्रमांमध्ये पाहिलं जातं. त्यावरून ती शाळेत जाते की नाही, असा सवाल नेटकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या. अशातच ऐश्वर्या पुन्हा एकदा कुटुंबासोबत जामनगर येथे दिसून आली. यापूर्वी ती अगस्त्य नंदाच्या चित्रपटासाठी आणि आता अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी बच्चन कुटुंबासोबत एकत्र दिसून आली.

News Title- Aishwarya Rai spotted with family at Anant Ambanis pre-wedding

महत्त्वाच्या बातम्या –

“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!

…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका

लोकसभेचे तिकिट मिळताच भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; खासदाराची पोलिसात धाव

“अभिनेत्याच्या मुलाचं कौतुक होत होतं पण…”, सुशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .