“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar vs Amol Kolhe | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. काका पुतण्यामध्ये आता वाद निर्माण झाला. पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगानं अजित पवार यांना दिल्यानं शरद पवार यांनी निवडणूक आयोग आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. अशातच आता दोन्ही गटांमध्ये चांगलीस चुरस रंगली आहे. शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं नाव न घेता अजित पवार यांनी (Ajit Pawar vs Amol Kolhe) आज (4 मार्च) रोजी सभा घेत टीकेचे बाण सोडले आहेत.

सध्या शरद पवार यांच्या गटामध्ये 4 खासदार आहे. तर अजित पवार यांच्याकडे 1 खासदार आहे. अजित पवार आपल्या पक्षामध्ये इतर आणखी खासदार कसे येतील असा त्यांचा प्रयत्न आहे. काही महिन्यांआधी (Ajit Pawar vs Amol Kolhe) डॉ. अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या बाजूने होते की शरद पवार यांच्या बाजूने होते याबाबत कोणतीही निश्चिती नव्हती. मात्र आता अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या बाजूने असल्याचं निश्चित झालं आहे. याचपार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अमोल कोल्हे (Ajit Pawar vs Amol Kolhe) यांच्यावर काही दिवसांआधी एक वक्तव्य केलं होतं. मी शिरूर मतदारसंघातून त्यांना माझा उमेदवार उभा करत पाडणार म्हणजे पाडणार, असं अजित पवार म्हणाले.

त्यानंतर त्यांनी शिरूरमध्ये सभा घेतली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी आतापर्यंत राजकारणात आलेले अभिनेते आणि अभिनेत्रींची नावं घेत राजकारणात नटनट्यांचं काय काम आहे? अशी मिश्कील टीका केली असून त्य़ांनी अमोल कोल्हे यांना टार्गेट केलं आहे. तसेच तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत, असंही अजित पवार म्हणालेत.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले की, राजकारणात अभिनेते धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, राजेश खन्ना निवडणुकीला उभे राहतात. त्यांचा राजकारणीशी काय संबंध? अमिताभ बच्चन यांनी देखील राजकारणात प्रवेश केला आणि निवडून आले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि सर्व सोडून गेले. त्यांना त्या भागातील विकास कामांची आवड आहे का हे महत्त्वाचं असतं.

“आम्ही निवडूण दिलं आमची चूक झाली”

सुरूवातीला बरं वाटतं मिशांना पिळ, राजबिंड गडी…निवडणुकीला उभं करून आम्ही निवडूण दिलं आमची चूक झाली. आम्हाला लोकांच्या मनातील काही ओळखता आलं नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

गेल्या काही महिन्यांआधी अजित पवार यांनी आगामी लोकसभेला शिरूर मतदारसंघातून त्यांचा उमेदवार उभा करत अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार, असा दावा माध्यमांशी बोलताना केला होता. अशातच शिरूर मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचं नाव न घेता हल्ला केला आहे.

News Tit;e – Ajit Pawar vs Amol Kolhe Shirur Assembly Election

महत्त्वाच्या बातम्या

‘अच्छा तो हम चलते हैं…’, धर्मेंद्र यांच्या पोस्टने चाहते चिंतेत

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्याची कुटुंबासोबत धमाल; व्हिडीओ तूफान व्हायरल

महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पुन्हा पाऊस बरसणार!

“बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर…”, मनोज जरांगे यांच्या ‘संघर्षयोद्धा’चा टीझर रिलीज

अनंत अंबानींच्या घड्याळाची मार्क झुकरबर्गच्या पत्नीला पडली भुरळ, व्हिडीओ तूफान व्हायरल