Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आणि राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार आता वेगळे झाले आहेत. राष्ट्रवादी ही आता अजित पवार यांची झाली आहे. निवडणूक आयोगानेही तसा निर्णय दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांना पक्ष आणि घडयाळ हे पक्ष चिन्ह दोन्ही मिळालं आहे.
अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट आता राष्ट्रवादीचे पडले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडून सतत एकमेकांवर निशाणा साधला जातो. त्यातच अजूनही कार्यकर्त्यांमध्ये अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील, अशी आशा आहे. यावरच अजित पवार यांनी स्वतः मोठा खुलासा केला आहे. शिरूर येथील एका सभेत त्यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं.
“अरे बाबांनो आता आमच्यात फाटलंय”
एका बाजूला ते (शरद पवार)आणि एका बाजूला आम्ही आहोत. काहीजण म्हणतात हे एकत्र येतील का? या चर्चांनी आमचे निम्मे गार होतील. दबकत बोलतात दादा काही होईल का? मी ही चर्चा करणाऱ्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हे काही होणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.
मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो की, आपली वेगळी वाट आहे त्यांची वेगळी वाट आहे. आज ही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता आमच्यात फाटलंय. उगाच मनात काही शंका ठेऊ नका, असंअजित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे पुन्हा अजित दादा (Ajit Pawar) आणि शरद पवार एकत्र येणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
अमोल कोल्हे यांच्यावर अजित दादांचा निशाणा
यावेळी अजित पवार (Ajit Pawar ) यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावरही निशाणा साधला. मागे मीच अमोल कोल्हे यांच्यासाठी मत मागायला तुमच्याकडे आलो होतो. त्यांचं वकृत्व चांगलं होतं. दिसायला राजबिंडा आहे. त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं. पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणत होता. मी सेलिब्रिटी आहे, मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलंय, असं अजित पवारांनी सांगितलंय.
पाहायला गेलं तर, अमोल कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाहीच. त्यानंतर शिवजयंतीला मला शिवनेरी किल्ल्यावर भेटले. मी बोललो, ‘काय हो डॉक्टर मागे तर राजीनामा द्यायला निघाले होते. आता पुन्हा दंड थोपटताय’ तर ते म्हणाले, आता पुन्हा इच्छा झाली आहे. या नट-नटयांचा राजकारणाशी संबंध तरी काय?, असा टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला.
News Title – Ncp Will Not Unite Again Said Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
पोस्ट ऑफिसची महिलांसाठी जबरदस्त योजना; होईल फायदाच फायदा
भर कार्यक्रमात रिंकू राजगुरूसोबत चाहत्यांनी केलं असं काही की, व्हिडीओ व्हायरल
अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी खर्च झाले तब्बल एवढे कोटी, आकडा ऐकून व्हाल थक्क