बारामती मतदारसंघाबाबत भाजपच्या महिला नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Assembly Election | बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Assembly Election) सध्या चर्चेत आहे. बारामती लोकसभेकडे (Baramati Assembly Election) राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. नुकताच बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान येथे नमो रोजगार मेळावा पार पडला. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवार आणि राज्यातील सत्ताधारी उपस्थित होते. आता याच बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये (Baramati Assembly Election) सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता आणखी एक अपडेट समोर आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Assembly Election) सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीत लढत होणार आहे. याबाबत जोरदार चर्चा असून दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत रथ फिरवले आहेत. त्यानंतर काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असू शकतात, असा दावा केला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची शक्यता आहे असं वक्तव्य भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे. यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अधिक रंगत निर्माण झाली आहे.

नेमक्या काय म्हणाल्या चित्रा वाघ?

बारामती मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार याच बाजी मारणार आहेत असा विश्वास महायुतीला आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. लोणावळ्यामध्ये रन फॉर नेशन, रन फॉर मोदी या मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. यावेळी त्या माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. आता भाजपनेही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची यादी बाहेर काढली आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळत आहे. मात्र भाजपच्या उमेदवारांच्या यादीमध्ये राज्यातील एकाही व्यक्तीचं नाव नाही. यावरून विरोधकांनी राज्यातील भाजपवर हल्लाबोल केला आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी एका वाक्यत उत्तर दिलं आहे.

मावळ मतदारसंघातून कोण लढणार?

लोणावळ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना मावळ मतदारसंघातून कोण दावा करणार? असा प्रश्न माध्यमांनी केल्यानंतर यावेळी चित्रा वाघ यांनी यावर पक्ष विचार करेल असं उत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पोस्ट ऑफिसची महिलांसाठी जबरदस्त योजना; होईल फायदाच फायदा

भर कार्यक्रमात रिंकू राजगुरूसोबत चाहत्यांनी केलं असं काही की, व्हिडीओ व्हायरल

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी खर्च झाले तब्बल एवढे कोटी, आकडा ऐकून व्हाल थक्क

यशस्वी व्हायचं असेल तर अशा लोकांपासून चार हात लांबच राहा!

मनोज जरांगेंनी फडणवीस यांना दिली आत्याची उपमा, म्हणाले…