कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

katrina kaif

Katrina Kaif | 2024 च्या सुरुवातीपासून बाॅलिवूडमधील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तर काही कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. या शिवाय मागील आठवड्यात बाॅलिवूडची फेमस जोडी म्हणून चर्चेत असणारे दीपिका आणि रणवीर यांनी देखील गुडन्यूज दिली होती. आपल्या आधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दीपिकाने स्पटेंबर 2024 अशी पोस्ट करत लवकरच दोघे आई बाबा होणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, आता बाॅलिवूडमधील अणखी एका जोडप्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगची जोरदार चर्चा आहे. याच वेळी पापाराझीच्या कॅमेऱ्यामध्ये कतरिना तिचं बेबीबंप लपवताना दिसली.

कतरिना होणार आई?

दोन दिवसांपासून जामनगरमध्ये आयोजित केलेल्या अनंत-राधिकाच्या प्री वेंडिगला बाॅलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. कतरिना (Katrina Kaif) आणि विक्की जेव्हा या कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये पोहचले तेव्हा कॅमेऱ्यामध्ये कतरिना तिचे बेबी बंप लपवत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता दीपिकानंतर कतरिना गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काय आहे प्रकार?

जमनागरमध्ये आयोजित केलेल्या अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगला बाॅलिवूडच्या संपूर्ण कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या वेळी अभिनेत्री कतरिना आणि विकी कौशल देखील उपस्थित होते. दरम्यान, कतरिना (Katrina Kaif)  कॅमेऱ्यासमोर येत असताना तिने बेबी बंप लपवल्याचं पाहायला मिळालं आणि सगळीकडे एकच चर्चा रंगली. या व्हिडीओमध्ये कतरिनाने गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस घातला आहे. तिने पोटाभोवती ओढणी घेतलीये. त्यामुळे ती बेबी बंप लपवत असल्याचं म्हटलं जात आहे.

दीपिका रणवीरची चर्चा-

या बातम्यांवर दीपिका आणि रणवीरने शिक्कामोर्तब केला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच आई होणार असल्याची माहिती जोडप्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांसोबत शेअर केली आहे. दीपिका वयाच्या 37 व्या वर्षी आई होणार आहे. तर दुसरीकडे कतरिनाने देखील आपलं बेबी बंप लपवल्याने कतरिना आणि विकी कौशलच्या घरी देखील लवकरच पाळणा हालणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

News Title : katrina kaif to be mom soon

महत्त्वाच्या बातम्या-

“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”

शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र येणार?, अजित पवारांनी अखेर खरं सांगूनच टाकलं

बारामती मतदारसंघाबाबत भाजपच्या महिला नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट!

“फडणवीस अजित पवारांना तुरुंगात पाठवणार होते पण…”

शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .