IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MS Dhoni | जगातील सर्वोत लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या 17 व्या आवृत्तीला सुरुवात होण्यासाठी फक्त 19 दिवस उरले आहेत. सलामीचा सामना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 22 मार्च रोजी चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. IPL 2023 चा चॅम्पियन संघ असलेल्या चेन्नईच्या संघाचे विजयी सलामी देण्याचे लक्ष्य असेल. मात्र याआधी एमएस धोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.

धोनी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. मात्र, आता त्याने फेसबुकवर एक पोस्ट करून क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या नव्या भूमिकेची माहिती दिली आहे. धोनी टीम इंडियाच्या अशा खेळाडूंपैकी एक आहे जे सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतात.

क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा

सोमवारी एमएस धोनीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिली. आयपीएलच्या नवीन हंगामासंदर्भात त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक ओळ लिहिली आहे. धोनीने लिहिले की, नवीन हंगाम आणि नवीन भूमिकेची प्रतीक्षा करू शकत नाही. धोनीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार नसल्याच्या बातम्या काही काळापासून येत आहेत. मात्र अद्याप फ्रँचायझीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचवेळी आता एमएस धोनीच्या या पोस्टनंतर चाहते संभ्रमात पडले आहेत.

 

MS Dhoni ची पोस्ट

चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल 2023 चे विजेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीने स्वतः सांगितले होते की, आयपीएल 2024 मध्येही संघाचा नवा कर्णधार निवडला जाऊ शकतो. धोनीने सीएसकेला पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे. रोहित शर्मानंतर तो आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. अलीकडेच धोनी पत्नी साक्षीसोबत अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग पार्टीचा आनंद घेताना दिसला होता.

दरम्यान, आयपीएलच्या आगामी हंगामाला 22 मार्चपासून सुरूवात होत आहे. सलामीच्या सामन्यात धोनीची आरसीबी आणि विराट कोहलीची आरसीबी यांच्यात लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. उर्वरीत वेळापत्रक आगामी काळात जाहीर केले जाईल.

News Title- MS Dhoni latest post on social media ahead fo ipl 2024

महत्त्वाच्या बातम्या –

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”

शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र येणार?, अजित पवारांनी अखेर खरं सांगूनच टाकलं

बारामती मतदारसंघाबाबत भाजपच्या महिला नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट!