अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Election | उत्तर प्रदेशातील भाजप खासदार उपेंद्र सिंह रावत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. अश्लील व्हिडीओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर त्यांनी सोमवारी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले की, माझा एक संपादित व्हिडीओ व्हायरल केला जात आहे, जो डीप फेक एआय तंत्रज्ञानाने तयार केला आहे. ज्यावरून मी एफआयआर दाखल केली आहे. या संदर्भात मी राष्ट्रीय अध्यक्षांना याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. जोपर्यंत मी निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मी सार्वजनिक जीवनात कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

शनिवारीच भाजपने खासदार उपेंद्र सिंह रावत यांना बाराबंकी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा खासदारकीचे तिकीट दिले आहे. तिकिटांची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारपासून सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये खासदार एका महिलेसोबत एका खोलीत दिसत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील हा व्हिडीओ 2022 चा असल्याचे सांगण्यात येत आहे.

खासदाराची निवडणुकीतून माघार

भाजपचे खासदार उपेंद्र सिंह रावत यांना पुन्हा तिकीट मिळाल्यानंतर 24 तासांतच एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला. खासदारांचे सचिव दिनेश रावत यांनी हा खासदारांची राजकीय प्रतिमा डागाळण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले असले तरी आता खासदारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बनावट आणि एडिट केलेला आहे, पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी रावत यांनी केली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओचा तपास करणारे पोलीस हा व्हिडीओ लॅबमध्ये पाठवून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक पोलीस अधिकारी जय कुमार त्रिपाठी म्हणाले की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

 

Lok Sabha Election चे वारे

दरम्यान, सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आगामी काळात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून सत्ताधारी भाजपने पहिल्या यादीत 195 उमेदवारांनी नावे जाहीर केली आहेत. भाजपने महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही.

विद्यमान खासदार उपेंद्र रावत 2019 मध्ये बाराबंकी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तेव्हा भाजपने तत्कालीन खासदार प्रियांका सिंह रावत यांचे तिकीट रद्द करून उपेंद्र सिंह रावत यांना उमेदवारी दिली होती. पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला पण व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.

News Title- mp upendra singh rawat obscene video viral on social media and he refused to contest election
महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”

शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र येणार?, अजित पवारांनी अखेर खरं सांगूनच टाकलं