WPL मध्ये RCB च्या शिलेदाराचा गगनचुंबी षटकार पण झालं मोठं नुकसान!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

WPL 2024 | सध्या महिला प्रीमिअर लीगचा (WPL 2024) थरार रंगला आहे. स्पर्धेतील 11 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. आरसीबीने हा सामना 23 धावांनी जिंकला. या सामन्यात आरसीबीकडून स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. आरसीबीच्या संघाची शिलेदार एलिसे पेरीने स्फोटक खेळी करून आपल्या घरच्या मैदानावरील अखेरचा सामना गाजवला. (Ellyse Perry Six Broke Car’s Window Glass) पण, तिच्या एका षटकाराने मोठे नुकसान झाले असून डिस्प्लेच्या काचा फुटल्या आहेत. (Car’s Window Glass) आरसीबीसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एलिसे पेरीने दमदार खेळी केली.

ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू एलिसे पेरीने आपल्या खेळीत 4 षटकार मारले, त्यापैकी एक षटकार सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचेवर आदळला, ज्यामुळे काच फुटून मोठे नुकसान झाले. कारची काच फुटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर पेरी ऑन साइड शॉट खेळत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर उभ्या असलेल्या कारच्या आरशावर आदळत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते आहे.

एलिसे पेरीचा गगनचुंबी षटकार

काच फुटल्यानंतर चेंडू गाडीच्या आत जातो. कारची काच फुटलेली पाहिल्यानंतर फलंदाज पेरीनेही अतिशय मनोरंजक प्रतिक्रिया दिली. आरसीबीच्या या स्टार खेळाडूने डावाच्या 19व्या षटकात दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर हा गगनचुंबी षटकार मारला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पेरीने 37 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 58 धावांची अर्धशतकी खेळी खेळली, ज्यामुळे आरसीबीला निर्धारित 20 षटकांत 3 बाद 198 धावा करता आल्या.

एलिसे पेरीने दुसऱ्या बळीसाठी कर्णधार स्मृती मानधनासोबत 95 धावांची आणि रिचा घोषसोबत तिसऱ्या बळीसाठी 42 धावांची भागीदारी केली. या सामन्यात यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आरसीबी संघाने 20 षटकात 198 धावा केल्या.

 

WPL 2024 चा थरार

स्मृती मानधना आणि एलिसे पेरी यांच्या खेळीच्या जोरावर यजमान संघाने मोठी धावसंख्या उभारली. आरसीबीच्या संघासाठी कर्णधार स्मृती मानधनाने 50 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या एलिस पेरीने 58 धावा केल्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यूपीच्या संघाला घाम फुटला. प्रथम फलंदाजीत अन् नंतर गोलंदाजीत आरसीबीने कमाल केली. लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीचा संघ 20 षटकात 8 बाद 175 पर्यंतच पोहोचू शकला आणि सामना 23 धावांनी गमावला.

News Title- wpl 2024 Ellyse Perry Six Broke Car’s Window Glass, watch here video
महत्त्वाच्या बातम्या –

अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”