केजरीवाल सरकारकडून महिलांना मोठं ‘गिफ्ट’, दिल्लीच्या अर्थसंकल्पात रामराज्याची चर्चा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Arvind Kejriwal | दिल्ली सरकारने महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. अर्थसंकल्प सादरीकरणानंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या अर्थसंकल्पाला रामराज्याचा अर्थसंकल्प असे संबोधले. यासोबतच त्यांनी जगातील सर्वात मोठ्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. दिल्ली सरकारच्या ‘दिल्ली सन्मान महिला योजना’ या योजनेच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी महिलांचे अभिनंदन केले. निवडणुकीनंतर ही योजना लागू होणार आहे.

या योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये देण्याची योजनाही नमूद करण्यात आली होती. याचा संदर्भ देत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सर्व महिलांचे अभिनंदन केले. केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील माता-भगिनींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही काही छोटी गोष्ट नाही. हा जगातील सर्वात मोठा महिला सक्षमीकरण कार्यक्रम असेल. हे सांगणे सोपे आहे, परंतु करणे सोपे नाही.

दिल्ली सरकारकडून महिलांना गिफ्ट

तसेच ज्या महिला कमावत नाहीत त्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी घरातील पती, मुले आणि नातेवाईकांकडे मदत मागावी लागते. अशा 18 वर्षांवरील महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जातील. ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठीही मोठा खर्च येईल. मात्र दिल्ली सरकार यासाठी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल यांनी आणखी सांगितले की, या योजनेचा लाभ घेण्याची पात्रताही निश्चित करण्यात आली आहे. महिला किंवा संबंधित मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, महिलेने सरकारी पेन्शनचा लाभ घेता कामा नये, सरकारी नोकरी करत नसावी. एकूणच बेरोजगार असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. किंवा ज्या महिला घरातील इतर सदस्यांवर अवलंबून असतात त्यांना आर्थिक मदत म्हणून दिल्ली सरकार ही योजना सुरू करत आहे.

Arvind Kejriwal यांची माहिती

कोणत्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सरकारी नोकरी करत असलेल्या महिलेला याचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय आयकर भरणारी महिलाही यासाठी पात्र ठरू शकत नाही. महिला स्वघोषणापत्र देऊनही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. निवडणुकीनंतर ही प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

दिल्लीतील केजरीवाल सरकारने सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीच्या वर्षात दिल्लीला रामराज्य बनवण्यावर चर्चा झाली. अर्थसंकल्प सादर करताना दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांनी रामाचे नाव घेतले. राम चरित मानसाचे पठण करून दिल्ली रामराज्याच्या प्रवासाला निघाली असल्याचे सांगितले. आतिशी यांनी केजरीवाल यांची तुलना प्रभू श्रीरामाशी तुलना केली.

News Title- Chief Minister Arvind Kejriwal has announced in the budget that the Delhi government will give Rs 1,000 per month to women

महत्त्वाच्या बातम्या –

WPL मध्ये RCB च्या शिलेदाराचा गगनचुंबी षटकार पण झालं मोठं नुकसान!

अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!