अभिनेत्री राणी मुखर्जीची मुलगी पहिल्यांदाच आली समोर, क्यूट व्हिडीओ होतोय व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rani Mukerji | अभिनेत्री राणी मुखर्जी बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दुर आहे. सध्या ती कुटुंबात जास्त व्यस्त झाली आहे. राणीची (Rani Mukerji) मुलगी आदिरा ही कधीच माध्यमांसमोर आली नाही. मात्र आता तिचा एक क्यूट व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ आता वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

जामनगर येथे झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर फक्त आणि फक्त या सोहळ्याचीच चर्चा आहे. सगळीकडे या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

राणी मुखर्जीची लेक अखेर समोर

याच कार्यक्रमात अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आपल्या कुटुंबासोबत सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील राणी आणि तिच्या लेकीचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. राणीसोबत तिची लेक आदिरा देखील या सोहळ्यात उपस्थित होती. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये राणी मुखर्जीची लेक गुलाबी रंगाच्या पारंपरिक कपड्यांमध्ये दिसून आली.

या व्हिडीओमध्ये राणी आपल्या लेकीची ओळख सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत करुन देताना दिसत आहे. आदिरा हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. व्हिडीओ दूरून शूट करण्यात आला आहे. त्यामुळे आदिराचा चेहरा पूर्ण दिसत नाही. मात्र, पहिल्यांदाच आदिराचा लुक समोर आल्याने चाहते आनंदित झाले आहेत.

राणी मुखर्जीची लेक आदिराचा व्हिडीओ व्हायरल

राणी मुखर्जीने (Rani Mukerji) नेहमीच लेक आदिरा हिला कॅमेरा आणि सोशल मीडियापासून दूर ठेवलं आहे. त्यामुळे आदिराची एक झलक दिसताच चाहते प्रचंड खुश झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.राणीने आपल्या लेकीला या झगमगत्या दुनियेपासून नेहमीच दुर ठेवलं आहे. आता ती पहिल्यांदाच सर्वांसमोर आली आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जी आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, काही न काही कारणामुळे ती कायम चर्चेत असते. एकेकाळी चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य करणारी राणी फार कमी सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येते.

News Title- Rani Mukerji daughter Adiras video goes viral

महत्त्वाच्या बातम्या –

अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”