“…ती चूक असेल तर 10 वेळा मला पक्षात येण्यासाठी निरोप का पाठवता?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol kolhe | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना धारेवर धरलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिरूरमध्ये सभा घेत अमोल कोल्हे (Amol kolhe) यांच्यावर हल्ला केला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी आतापर्यंत राजकारणात आलेले अभिनेते आणि अभिनेत्रींची नावं घेत राजकारणात नटनट्यांचं काय काम आहे? अशी मिश्कील टीका केली.

तसेच तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत, असंही अजित पवार म्हणालेत. राजकारणात अभिनेते धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, राजेश खन्ना निवडणुकीला उभे राहतात. त्यांचा राजकारणीशी काय संबंध? असं म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. (Amol kolhe)

सुरूवातीला बरं वाटतं मिशांना पिळ, राजबिंड गडी…निवडणुकीला उभं करून आम्ही निवडूण दिलं आमची चूक झाली. आम्हाला लोकांच्या मनातील काही ओळखता आलं नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. यावर आता अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या टीकेला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे. (Amol Kolhe)

अमोल कोल्हे यांचा पलटवार

मला शरद पवार यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीला संधी दिली होती. तुम्ही माझी संसदेतील कामगिरी आणि माझ्या कामाचा लेखाजोगा तपासून पाहू शकता. तुम्हाला मी सांगतो मी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेवर मी ठाम आहे. मी मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी कटीबद्ध राहिल असं अमोल कोल्हे म्हणाले.

त्यांनी अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, धर्मेंद्र या कलाकारांची उदाहरणं दिली. त्या सेलिब्रिटींना संसद रत्न मिळाल्याची माझ्या ऐकिवात नाही. मला तीन वेळा संसंद रत्न मिळाला असल्याचं सांगत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे. एक्स मायक्रॉब्लॉगिंग या प्लॉटफॉर्मवर अमोल कोल्हे यांनी व्हिडीओ शेअर केला.

अमोल कोल्हे यांचं जसंच्या तसं वक्तव्य

खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल, वेगवेगळे आरोप करत असाल तर मी नम्रपणे तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. माझ्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं चूक असेल तर १०-१० वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप पाठवण्याचं कारण काय? लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय?

News Update – Amol Kolhe Aggressive on Ajit pawar Shirus Election

महत्त्वाच्या बातम्या

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”

शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र येणार?, अजित पवारांनी अखेर खरं सांगूनच टाकलं

बारामती मतदारसंघाबाबत भाजपच्या महिला नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट!