महाविकास आघाडीत जागा वाटपावरून घमासान, नेत्यानं सांगितली अंदर की बात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस-शिवसेना-शरद पवार गटात जागा वाटपावरून घमासान सुरू असल्याचं कळतंय. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अंदर की बात सांगितली आहे. या तिन्ही पक्षांमध्ये ताटातूट पाहायला मिळत असल्याचं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. मात्र अद्यापही आम्ही जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा केली नसल्याचं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घमासान

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये सभा घ्यायला सुरूवात केली आहे. येत्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील पोल खोलली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या 10 जागांवरून वाद आहे. तर शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये 5 जागांवरून वाद आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली आहे.

भंडाऱ्यात सभा घेत असताना प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन सारे एक होऊया, सत्ता हाती घेऊया अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. यावेळी त्यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजपावर टीका केली आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये एकूण 15 जागांवरून वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. आम्ही महाविकास आघाडीतून अद्यापही बाहेर पडलो नाही. आता त्यांचीच भांडणं सुरू आहेत. आमच्याशी चर्चा कधी सुरू होणार?, असा सवाल उपस्थित केला.

आता आचारसंहिता ही 12 ते 16 मार्चपर्यंत असेल. आता राहिले किती दिवस, त्यांचं भांडण मिटलं तर ठिक त्यानंतर आमची चर्चा सुरू होईल, त्यांनाही आरएसएसचं आणि भाजपचं सरकार नकोय आणि आपल्यालाही आरएसएस आणि भाजपचं सरकार नकोय, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

“महाविकास आघाडीत या”, आव्हाडांचं आवाहन

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबतच यावं असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट करत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावं अशी विनंती केली आहे. जर कोणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हात घालणारं असेल तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

लवकरच समविचारी पक्षाशी बैठक करून महाराष्ट्रामध्ये नवीन संदेश देऊया, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भिम, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

News Title – Prakash Ambedkar Talk About Shivsena, NCP, Congress

महत्त्वाच्या बातम्या

केजरीवाल सरकारकडून महिलांना मोठं ‘गिफ्ट’, दिल्लीच्या अर्थसंकल्पात रामराज्याची चर्चा

WPL मध्ये RCB च्या शिलेदाराचा गगनचुंबी षटकार पण झालं मोठं नुकसान!

अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल