“तुम्ही सरकारकडे काही मागू नका…”; नाना पाटेकर स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nana Patekar | देशामध्ये सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही. दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या योजना राबवल्या असल्या तरीही त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, असं विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका होत आहे. अशातच आता अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी शेतकऱ्यांबाबत भावना व्यक्त केली आहे.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, आता शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी पाठिंबा दिला आहे. सरकारला मागण्यापेक्षा कोणतं सरकार आणायचं याकडं लक्ष द्या, असं नाशिकच्या शेतकरी संमेलनात नाना पाटेकर (Nana Patekar) म्हणाले आहेत.

काय म्हणाले नाना पाटेकर?

शेतकऱ्याला तुमची किंमत नसेल तर आम्ही तरी तुमची किंमत का करायची?, असा सवाल नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी उपस्थित केला आहे. आधी 80 ते 90 टक्के शेतकरी होते. आता 50 ते 60 टक्के शेतकरी आहेत. तुम्ही सरकारकडे काही मागू नका तुम्ही कोणतं सरकार आणाल हा निर्णय घ्या. मला राजकारणात जाता येत नाही कारण माझ्या जे पोटात आहे ते माझ्या ओठात आहे. यामुळे मला पक्षातून दुसऱ्या दिवशी काढून टाकतील, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत.

मी आत्महत्या केली तरीही मी शेतकरी म्हणूनच जन्माला येणार. शेतकरी असं कधीच म्हणणार नाही की मला शेतकरी पुनर्जन्म नको. आपल्याला जनावरांची, प्राण्यांची भाषा समजते मग शेतकऱ्यांची भाषा का कळत नाही? असा सवाल नाना यांनी सरकारला उपस्थित केला आहे. नाना पाटेकर यांनी य़ाआधी देखील शेतकऱ्यांबाबत वक्तव्य केलं होतं.

नाना पाटेकर यांनी अनेकदा मुलाखतीत पक्षांबाबत परखड मत व्यक्त केलं होतं. त्यांना अनेकदा मुलाखतीत राजकारणाबाबत प्रश्न विचारले जात होते. त्यावर त्यांनी मला राजकारणावर प्रश्न विचारू नका असं सांगितलं होतं. कारण मी राजकारणावर परखड बोलायचो मग मला पुन्हा कॉन्ट्रोव्हर्सीला सामोरं जावं लागेल.

“आज भाजप काही तरी छान करेल”

माझे वडील हे कट्टर काँग्रेसवादी होते. मी शिवसेनेचा होतो. आणि आज भाजप काही तरी छान करेल असं मला वाटतं असं नाना पाटेकर म्हणाले आहेत. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम करण्याची पद्धत आवडली आहे, असं नाना म्हणाले.

News Title – Nana Patekar Talk About Farmers and political party

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; वाढत्या ट्रॅफिकमुळे मोठा निर्णय

इमरान हाश्मी आणि मौनी रॉयचा किसिंग सीन चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“…ती चूक असेल तर 10 वेळा मला पक्षात येण्यासाठी निरोप का पाठवता?”

अभिनेत्री राणी मुखर्जीची मुलगी पहिल्यांदाच आली समोर, क्यूट व्हिडीओ होतोय व्हायरल

अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा खुलासा!