महायुतीचा राज्यातील जागावाटपाचा तिढा सुटला? अमित शाह यांची मुंबईत बैठक!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amit Shah | सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सत्ताधारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून 195 उमेदवार समोर आले आहेत. मात्र, महाराष्ट्रात जागावाटपावरून भाजप आणि युती पक्षांमध्ये मतभेद असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी रात्री मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पोहोचले. गृहमंत्र्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळी लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाली असल्याचे कळते.

अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. याआधी सोमवारी रात्री गृहमंत्री अमित शाह मुंबईत पोहोचले. मंगळवारी त्यांनी छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. महाराष्ट्रातील जागावाटपाच्या वादावर अमित शाह यांनी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली.

महाराष्ट्रात जागावाटपाचा तिढा

अमित शाह आज देखील बैठक घेणार आहेत. त्यानंतर महायुतीतील म्हणजेच एनडीएमधील जागावाटपाचा वाद संपेल अशी अपेक्षा आहे. आता मुद्दा हा आहे की, कोणत्या आणि किती जागांवर तिन्ही पक्षांमध्ये वाद आहे, महायुतीमध्ये कोणत्या जागांवरून वाद आहे यावर भाष्य करायचे झाले तर, पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे.

दक्षिण मुंबईच्या जागेवरून महायुतीत संघर्ष पाहायला मिळत आहे. कारण ही जागा मागच्या वेळी शिवसेनेने लढली होती पण आता भाजपला इथून निवडणूक लढवायची आहे. उत्तर पश्चिममधून शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या जागेवर भाजपला निवडणूक लढवायची आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर भाजप-शिवसेना दोन्ही पक्षांनी दावा केला आहे.

Amit Shah यांचा महाराष्ट्र दौरा

शिरूरमध्ये विद्यमान खासदार शरद पवार गटाचे आहेत. पण या जागेवर अजित पवार आणि शिंदे यांच्यावर शिवसेनेने दावा केला आहे. मावळची जागा अजित पवारांना हवी आहे. गडचिरोलीची जागा भाजपकडे आहे पण तिथून लढण्यासाठी अजित पवारांचा गट आग्रही आहे. तर, नाशिकच्या जागेवर भाजपने दावा केला आहे.

दरम्यान, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी आणि अमरावती या जागांवर भाजपने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मात्र, अमरावती वगळता सर्व जागांवर मागील वेळी शिवसेनेचे उमेदवार होते. माढ्याची जागा अजित पवार गटाला हवी आहे, तर सातारा लोकसभेवर अजित पवार आणि भाजप दोघांनीही दावा ठोकला आहे. इथे शरद पवार गटाचा विद्यमान खासदार आहे.

News Title- Union Home Minister and BJP leader Amit Shah is on a visit to Maharashtra in the wake of the Lok Sabha elections
महत्त्वाच्या बातम्या –

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, राज्यपालांना मेल गेल्याने खळबळ

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून घमासान, नेत्यानं सांगितली अंदर की बात

घटस्फोटानंतर सानिया मिर्झा जगतेय ‘असं’ आयुष्य, पाहा फोटो

“तुम्ही सरकारकडे काही मागू नका…”; नाना पाटेकर स्पष्टच बोलले

नात्यात दुरावा निर्माण व्हायचं ‘हे’ ठरू शकतं सर्वांत मोठं कारण!