“एवढी मेहनत करूनही घराणेशाहीचा टॅग लावतात, अभिनय येत नाही असंही म्हणतात”

Janhvi Kapoor

Janhvi Kapoor | बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मागील काही काळापासून प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. जान्हवी कपूर येत्या काही दिवसांत ‘देवरा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती ज्युनियर एनटीआरसोबत झळकणार आहे. जान्हवी कपूरने 2018 मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील तिचा अभिनय अनेकांना आवडला, तर काही लोक तिला घराणेशाहीवरून ट्रोल करताना दिसले. ‘धडक’नंतर जान्हवीने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण आजही तिच्या नावासोबत घराणेशाहीचा टॅग जोडला जातो.

अलीकडेच अभिनेत्री या विषयावर आपले मत उघडपणे मांडताना दिसली. अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, पूर्वी मला ट्रोलिंगचा खूप त्रास व्हायचा. “पूर्वी मला ट्रोलिंगचा त्रास सहन करावा लागायचा. मला वाटायचे की एवढी मेहनत करूनही लोक असे कोणाला घराणेशाहीचा टॅग कसा देऊ शकतात. मी आधीच्या चित्रपटापेक्षा प्रत्येक चित्रपटात चांगले काम करते, तरीही तेच तेच ऐकून फार वाईट वाटते”, असे जान्हवीने सांगितले.

अभिनेत्रीने व्यक्त केली खदखद

जान्हवी कपूर पुढे म्हणाली की, कदाचित लोक जाणूनबुजून कोणाची तरी मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहू इच्छित नाहीत. ते फक्त ट्रोलिंगशी संबंधित आहेत. आता मला समजले आहे की ट्रोलर्स हे स्वतः दुःखी लोक आहेत जे कोणाचेही सुख पाहू शकत नाहीत. आता मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे.

जान्हवी कपूर आगामी काळात अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआरचा ‘देवरा’ ते राम चरणचा पुढील चित्रपट ‘आरसी 16’ यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘RC 16’ चे दिग्दर्शन बुची बाबू सना करत आहेत.

Janhvi Kapoor चे आगामी चित्रपट

दरम्यान, आगामी काळात जान्हवी काही चांगल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीपासून साऊथ चित्रपटांचा समावेश आहे. OTT चित्रपट बवालनंतर अभिनेत्रीचा पुढचा चित्रपट देवरा आहे, ज्यामध्ये ती साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे. यानंतर जान्हवी मिस्टर अँड मिसेस सारख्या चित्रपटामधूनही चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

बुधवारी अभिनेत्री जान्हवीने तिचा 27 वा वाढदिवस साजरा केला. जान्हवी आताच्या घडीला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. धडक चित्रपटातून पदार्पण करणारी जान्हवी तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

News Title- Bollywood actress Janhvi Kapoor has commented on trollers
महत्त्वाच्या बातम्या –

सौरव गांगुलीची राजकारणात एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, 30 मिनिटे चर्चा!

“मी आर्थिक समस्येचा सामना केला पण पैशासाठी कधीच…”, कंगनाचा संताप

“अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी गायलं खास गाणं, Video

सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी

“विचारपूर्वक बोला नाही तर…”, राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाच्या सूचना

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .