सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी

Munawar Faruqui | सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेट असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. भारतात सचिनच्या नावाने अनेकजण क्रिकेटकडे आकर्षित झाले आहेत. आजच्या घडीला क्रिकेट विश्वावर राज्य करणारा विराट कोहली, स्टार खेळाडू शुभमन गिलसह अनेक युवा खेळाडू सचिनला आपला आदर्श मानतात. सचिनची फलंदाजी पाहून अनेकांनी क्रिकेटच्या खेळपट्टीवर पाऊल ठेवले. त्याच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी हजारो-लाखो तरूण दररोज घाम गाळत असतात. सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी मैदानातील त्याची झलक नेहमी चाहत्यांना भुरळ घालत असते. आता पुन्हा एकदा क्रिकेटचा देव फलंदाजी करताना दिसला आहे.

आयएसपीएल अर्थात इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगच्या प्रदर्शनीय सामन्यात जे दिसले ते कदाचित कोणीही अपेक्षित केले नसेल. या स्पर्धेच्या माध्यमातून बॉलिवूड कलाकार क्रिकेटच्या मैदानात उतरले आहेत. अशातच बिग बॉसचा विजेता मुनावर फारुकी याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला बाद केले. सचिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते यावर भन्नाट प्रतिक्रियाही देत आहेत.

चाहत्यांनी घेतली फिरकी

इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगला सुरूवात झाली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. ही T10 टेनिस स्पर्धा आहे ज्यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर देखील सहभागी होत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक प्रदर्शनीय सामना झाला, ज्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बिग बॉसच्या 17 व्या सीझनचा विजेता मुनावर फारुकीने बाद केले.

बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकी याने एका रोमांचक प्रदर्शनीय सामन्यात पाचव्या षटकात महान सचिन तेंडुलकरला बाद केले. सचिनने 17 चेंडूत 30 धावा केल्या असल्या तरी मास्टर ब्लास्टरला बाद करतानाचा फारुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

Munawar Faruqui ची दमदार गोलंदाजी

फारुकीच्या षटकात सचिन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना फसला अन् बाद झाला. फारूकीने टाकलेल्या चेंडूवर सचिनला मोठा फटका मारायचा होता. पण तो चेंडूला नीट टोलावू शकला नाही आणि चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि सरळ हवेत गेला. अशा स्थितीत 30 यार्ड सर्कलमध्ये त्याचा झेल सहज पकडला गेला.

सचिनचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक दिग्गज गोलंदाज आपल्या कारकिर्दीत मास्टर ब्लास्टरला बाद करण्यात अपयशी ठरले. सचिनला बाद केल्यानंतर फारूकीची चाहते फिरकी घेत आहेत. 24 वर्ष भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत एकूण 200 कसोटी, 463 वन डे आणि 1 ट्वेंटी-20 सामना खेळला आहे.

News Title- Bigg Boss 17 winner Munawar Faruqui knocks out Sachin Tendulkar in Indian Street Premier League exhibition match, watch video
महत्त्वाच्या बातम्या –

“बारामतीची ओळख शरद पवार साहेबांमुळे, म्हणून…”

“मोदी-शहा महाराष्ट्रामध्ये येऊन मनोरंजन करतात”

‘त्या खोलीत रात्रभर…’; अभिनेत्री करिना कपूरने करिश्माबद्दल केला सर्वात मोठा खुलासा

नवनीत राणा यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

“भारत माता की जय मान्य नाही”; ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य