“भारत माता की जय मान्य नाही”; ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

DMK MP A.Raja | डीएमकेचे खासदार ए.राजा यांनी मंगळवारी (5 मार्च) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने एकच वाद रंगला आहे. त्यांनी जय श्री राम आणि भारत माता की जय आम्ही कधीच मान्य करणार नाही, असं (DMK MP A.Raja) म्हटलं आहे. यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

काही महिन्यांपुर्वी ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना एचआयव्हीशी केली होती. तेव्हा बराच वाद रंगला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यावरून भाजप आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी टार्गेट करत आहे.

ए. राजा यांचं वादग्रस्त वक्तव्य

मदुराई येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना माजी केंद्रीय मंत्री ए. राजा म्हणाले की, “तमिळनाडू त्यांच्या (भाजप) स्पष्टीकरणावर आधारित राम किंवा भारत माता स्वीकारणार नाही. रामाचा शत्रू कोण आहे? माझ्या तामिळ शिक्षकाने सांगितले की राम सीतेसोबत जंगलात गेला. शिकारीचा स्वीकार केला. त्याने सुग्रीव आणि विभीषण यांनाही भाऊ म्हणून स्वीकारले. तेव्हा कोणतीही जात किंवा पंथ नव्हता. मी रामायणावर विश्वास ठेवत नाही.” ए. राजा (DMK MP A.Raja) यांच्या या वक्तव्याने आता एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, “भारत हा देश नसून एक उपखंड आहे. देश म्हणजे एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. भारत हा देश नसून एक उपखंड आहे. जर एखाद्या समुदायाने गोमांस खाल्ले तर ते स्वीकारा. मणिपूरमध्ये कोणी कुत्र्याचे मांस खात असेल तर ते त्यांच्या संस्कृतीत आहे. यात तुम्हाला कशाची अडचण?”, असा प्रतिसवाल करत ए. राजा यांनी पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.

भाजपकडून राहुल गांधी टार्गेट

लोकसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूमध्ये द्रमुक राहणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. मात्र, निवडणुकीनंतर द्रमुक नाही राहिला, तर भारतही राहणार नाही, असा दावा देखील ए. राजा (DMK MP A.Raja) यांनी यावेळी केला.

ए राजा यांच्या या वक्तव्याचा आता भाजपकडून तीव्र निषेध केला जात आहे. हा व्हिडीओ भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून इंडिया आघाडीचे नेते देशविरोधी वक्तव्य करत असताना राहुल गांधी गप्प का बसले आहे?, असा सवाल अमित मालवीय यांनी केला आहे. यावरून आता राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर आले आहेत.

News Title- DMK MP A.Raja Controversial statement

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आठवली ‘देशभक्ती’, खेळाडूंना दिला गंभीर इशारा!

Facebook आणि Instagram डाऊन अन् मार्क झुकरबर्गचं मोठं नुकसान!

मुंबईकरांसाठी खुशखबर! CNG च्या दरात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले

850 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; तरूणाईला संधी मिळावी म्हणून निर्णय