मुंबईकरांसाठी खुशखबर! CNG च्या दरात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

CNG | देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. निवडणूक आयोग या महिन्यात केव्हाही देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहेत. अशातच सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 2.5 रुपयांनी कपात झाली आहे. महागाईच्या काळात सीएनजीच्या किमतीत झालेली ही कपात सामान्यांना दिलासा देणारी आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईसारख्या महानगरात सीएनजीच्या दरात किलोमागे अडीच रुपयांनी घट झाली आहे. खरं तर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

मुंबईकरांसाठी खुशखबर!

त्यामुळे सीएनजीची किंमत 73.50 रुपये प्रति किलोवर आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील महानगर गॅसने (MGL) या महिन्याच्या सुरूवातीला सीएनजीच्या दरात घट करून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला. सध्या जनता महागाईने हैराण झाली आहे. एमजीएल मुख्यत्वे देशाच्या आर्थिक राजधानीत सीएनजीचा पुरवठा आणि विक्री करते.

एमजीएलने मंगळवारी संध्याकाळी उशिरा एक निवेदन जारी करून सीएनजीच्या किमती कमी झाल्याची माहिती दिली. तसेच गॅसचा उत्पादन खर्च कमी झाला आहे, त्यामुळे सीएनजीची किंमत कमी करण्यात आल्याचे सांगितले. नवीन किमती 5 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू झाल्या आहेत. उत्पादन खर्चात कपात झाल्यामुळे येत्या काही दिवसांत देशाच्या इतर भागात सीएनजीच्या दरात कपात होण्याची अपेक्षा वाढली आहे.

CNG च्या दरात कपात

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीएनजीच्या दरात कपात झाली आहे. पण सध्या देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात (NCR) सीएनजीच्या किमती स्थिर आहेत. मात्र येथे गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीमुळे महागाईचा मुद्दा बाजूला सारण्यासाठी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देईल असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

आताच्या घडीला दिल्लीत सीएनजीची किंमत 76.59 रुपये प्रति किलो आहे. याशिवाय नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये ही किंमत 81.20 रुपये प्रति किलो आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) या सर्व भागात CNG आणि PNG पुरवठा करते.

News Title- price of CNG in Mumbai has been reduced by Rs 2.5
महत्त्वाच्या बातम्या –

7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले

850 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; तरूणाईला संधी मिळावी म्हणून निर्णय

महायुतीचा राज्यातील जागावाटपाचा तिढा सुटला? अमित शाह यांची मुंबईत बैठक!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, राज्यपालांना मेल गेल्याने खळबळ

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून घमासान, नेत्यानं सांगितली अंदर की बात