Mark Zuckerberg | मंगळवारी रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक बंद होताच एकच खळबळ माजली. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांपैकी एक असलेल्या मेटाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. भारतासह जगाच्या विविध भागांतून इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा अमेरिकन शेअर बाजारात मेटा प्लॅटफॉर्मच्या शेअरच्या किमतीही घसरायला लागल्या. इन्स्टाग्राम, फेसबुक, थ्रेड्स आणि व्हॉट्सॲप सारख्या प्लॅटफॉर्मचीही मालकी मेटाकडे आहे.
जगाच्या विविध भागांमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम जवळपास 2 तास डाऊन राहिले. ही वेळ जवळजवळ अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या वेळेशी जुळली. याचा परिणाम असा झाला की अमेरिकन शेअर बाजारात मेटाचे शेअर्स घसरणीच्या ट्रेंडसह उघडले.
रात्री फेसबुक-इन्स्टाग्राम डाऊन
भारतासह जगातील अनेक भागांत फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाले होते. त्यामुळे या दोघांची मालकी असलेल्या मार्क झुकेरबर्गची कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्समध्येही घसरण झाली. फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन होताच नेटकऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून व्यथा मांडताना भन्नाट मीम्सही व्हायरल केले.
खरं तर मेटाचे शेअर 498.19 डॉलरच्या भावावर बंद झाले होते. पण फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर मेटाच्या शेअरच्या किमतीत घसरणीचा कल दिसून आला आणि तो 494 डॉलरच्या किमतीवर उघडला. फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याची बातमी वेगाने पसरू लागली, मेटा प्लॅटफॉर्मच्या शेअर्सची किंमत US वेळेनुसार सकाळी 10.50 वाजता 488 डॉलरच्या भावावर पोहोचली.
Mark Zuckerberg ला फटका पण…
मात्र, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याची परिस्थिती सुमारे 2 तासात निवळली. यानंतर यूएस वेळेनुसार सकाळी 11.37 वाजता मेटाच्या शेअरमध्ये सुधारणा दिसून आली. घसरत चाललेला मेटाचा शेअर 491 डॉलरच्या भावाच्या किमतीवर ट्रेड करत होता.
दरम्यान, ‘DownDetector’ वेबसाइट डाऊन असल्याबद्दलचा रिअल टाइम डेटा ठेवते. भारतीय वेळेनुसार रात्री 8.32 वाजता फेसबुक डाऊन झाले आणि रात्री 10.33 वाजता देखील समस्या पूर्णपणे सुटू शकली नव्हती. त्याचप्रमाणे इन्स्टाग्राम रात्री 8.37 वाजता डाऊन झाले. रात्री उशिरा दोन्हीही प्लॅटफॉर्म सुरू झाली. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
News Title- After Facebook and Instagram went down, Mark Zuckerberg’s Meta shares fell in the US market
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईकरांसाठी खुशखबर! CNG च्या दरात मोठी कपात, सामान्यांना दिलासा
7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले
850 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; तरूणाईला संधी मिळावी म्हणून निर्णय
महायुतीचा राज्यातील जागावाटपाचा तिढा सुटला? अमित शाह यांची मुंबईत बैठक!
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, राज्यपालांना मेल गेल्याने खळबळ