पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आठवली ‘देशभक्ती’, खेळाडूंना दिला गंभीर इशारा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pakistan | पाकिस्तान क्रिकेट बोर्ड विविध कारणांमुळे चर्चेत असते. भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप पाहायला मिळाला. शेजारील संघाचा माजी कर्णधार बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांसह निवडकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली. बाबरच्या राजीनाम्यानंतर शान मसूदकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. तर शाहीन शाह आफ्रिदीकडे ट्वेंटी-20 संघाची धुरा आहे. पीसीबीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी काही आठवड्यांपूर्वीच अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानी खेळाडूंना कडक शब्दांत इशारा दिला आहे. अलीकडेच त्यांनी अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच पाकिस्तानी संघातील खेळाडूंशी संवाद साधला. नक्वी यांनी खेळाडूंना कडक आदेश देत त्यांच्यासाठी देश प्रथम आला पाहिजे, असे ठणकावून सांगितले. त्यांनी बैठकीत सांगितलेल्या गोष्टींवरून स्पष्टपणे दिसून येते की, त्यांना प्रत्येक परिस्थितीत पाकिस्तानी संघाला चांगली कामगिरी करताना पाहायचे आहे, म्हणूनच त्यांनी देशसेवेला प्राधान्य देण्याबद्दल भाष्य केले आहे.

“सर्वांसाठी पाकिस्तान प्रथम येतो”

मोहसीन नक्वी म्हणाले की, मी इतिहासात जाऊन कोणावरही बोट दाखवणार नाही की काय चूक झाली आहे, पण इथून मी हे सुनिश्चित करू इच्छितो की संघातील प्रत्येक खेळाडू देशाच्या सेवेसाठी समर्पित राहील. सर्वांसाठी पाकिस्तान प्रथम येतो आणि देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये उत्साह भरलेला असावा.

तसेच मी कोणालाही फ्रँचायझी लीग खेळण्यापासून किंवा पैसे कमवण्यापासून रोखणार नाही, पण त्याचा राष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम होऊ नये. राष्ट्रीय क्रिकेटला धक्का पोहोचेल अशी कोणतीही मागणी मान्य केली जाणार नाही. जर तुमच्याकडे मोकळा वेळ असेल तर तुम्ही खासगी क्रिकेट खेळून पैसे कमवू शकता. परंतु तुम्हाला नेहमीच राष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी समर्पित राहावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

Pakistan च्या खेळाडूंना इशारा

मोहसीन नक्वी हे पाकिस्तानी माध्यमांशी संबंधित असलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व असून त्यांची 6 फेब्रुवारी 2024 रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते पुढील 3 वर्ष मंडळाच्या अध्यक्षपदावर राहतील.

दरम्यान, यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रमीझ रझा हा देखील पीसीबीचा अध्यक्ष होता. परंतु राजकीय कारणांमुळे 15 महिने सेवा दिल्यानंतर त्याला काढून टाकण्यात आले. आता मोहसिन नक्वीकडून शेजाऱ्यांना अपेक्षा असेल की, ते पाकिस्तान क्रिकेटच्या भविष्यासाठी काही चांगले निर्णय घेतील.

News Title- Pakistan Cricket Board President Mohsin Naqvi has warned the players
महत्त्वाच्या बातम्या –

Facebook आणि Instagram डाऊन अन् मार्क झुकरबर्गचं मोठं नुकसान!

मुंबईकरांसाठी खुशखबर! CNG च्या दरात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले

850 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; तरूणाईला संधी मिळावी म्हणून निर्णय

महायुतीचा राज्यातील जागावाटपाचा तिढा सुटला? अमित शाह यांची मुंबईत बैठक!